Jalgaon Municipal Corporation  esakal
जळगाव

Jalgaon : शहरातील रस्तेकामाचा वाद आता महासभेत येणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासनाने शहरातील रस्तेकामासाठी निधी पाठविला; परंतु त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले. त्यांनी कामात दिरंगाई केल्यामुळे नागरिकांत नाराजी निर्माण झाली आहे. तसेच काम न झाल्याने महापालिकेलाच कारण नसताना जबाबदार धरले जात आहे. (PWD jalgaon municipal corporation decision about road construction in mahasabha Jalgaon latest news)

त्यामुळे आता शासनाच्या ५८ कोटींच्या शासकीय निधीतून होणारी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी की महापालिकेमार्फत करावे याबाबत महासभेने निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव प्रशासनातर्फे दाखल करण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने ४२ कोटींचा निधी पाठविला. मात्र ही कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विभागातर्फे कामे लवकर होतील अशी नगरसेवकांची अपेक्षा होती, मात्र या विभागातर्फे प्रचंड दिरंगाई करण्यात आली.

दहा रस्त्यांची कामेही या विभागातर्फे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे शहरातील रस्त्याच्या खड्डयांमुळे नागरिकांची नाराजी निर्माण झाली. महापालिकेला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले.

तसेच शहरातील मक्तेदार सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेला असल्याने त्यावर कारवाई करण्याचे अधिकारही महापालिकेला नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही त्याबाबत ऐकत नाहीत. त्यामुळे महापाकिलेतर्फे निधी देऊनही कामासाठी दुसऱ्या विभागावर अवंलबून रहावे लागत आहे

कामे करण्याबाबत निर्णय घ्यावा

शासनाचा आता रस्त्यासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला आहे. मात्र या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची कामे करावे की महापालिकेने रस्त्याची कामे करावे याबाबत महासभेने निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनातर्फे महासभेकडे पाठविण्यात येणार आहे.

सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहरातील रस्त्याच्या कामाच्या आलेल्या अनुभवामुळे नगरसेवकांना आता पुढील शासकीय निधीतून होणाऱ्या कामाबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT