जळगाव

जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, सुसाट वाऱ्याने सात हजार हेक्टरवर केले नुकसान 

देविदास वाणी

जळगाव ः जळगाव जिल्हयात रात्री अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सुसाट वाऱ्याने मका, गहू, दादर ज्वारी ही पिके आडवी झाली आहेत. कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. परंतु जामनेर, चाळीसगावनजीकच्या काही गावांमध्ये दोन ते तीन सेकंद गारपीट झाल्याची माहिती आहे. 

गुरुवारी रात्री आठनंतर सुरवातीला सुसाट वारा १५ ते २० मिनिटे सुरू होता. नंतर हलका पाऊस झाला. जळगाव, धरणगाव, एरंडोलात सहा मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर धुळ्यातही सरासरी पाच मिलीमीटर पाऊस झाला आहे. 
पावसाचा जोर नव्हता, परंतु सुसाट वाऱ्यामुळे गहू आडवा झाला आहे. दादर ज्वारी कापणीवर आली आहे. तसेच हरभऱादेखील अनेक भागात कापून शेतात पडून आहे. त्याची मळणी राहीली आहे. अशात पाऊस आल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव, चोपडा, यावल भागात मका पीक अधिक असून, या भागात पीक आडवे झाले आहे. नुकसानीचा अंदाज सांगण्यात आलेला नाही. परंतु रब्बी पिकांची ४० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचे सांगितले जात आहे. पंचनामे तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

मका, गव्हाचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात मका पिकाचे सुमारे दोन ते तीनच हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर गहू पिकाचे सुमारे ७ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. काढणीवरील केळी बागांना रावेर, यावल भागात अंशतः फटका बसला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातही केळी, रब्बी पिकांची हानी झाली आहे. 
 

शहरात झाड पडले 
रात्री झालेल्या सुसाट वाऱ्याने गोलाणी मार्केट जवळील बँक ऑफ बडोदा जवळ झाड उन्मळून पडले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. झोपडपटटी एरियात अनेक घरांची पत्र उडाली आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT