raksha khadse 
जळगाव

Sakal Impact : सीएमव्हीग्रस्त केळी बागांच्या पंचनाम्यांचे तातडीने आदेश द्या; रक्षा खडसेंची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : तालुक्यासह जिल्ह्यातील केळीवर आलेल्या सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) रोगाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार रक्षा खडसे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी उशिरा किंवा उद्या (ता. १६) पंचनाम्याचे आदेश निघतील, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (Raksha Khadse Demand CMV infected banana orchards Order panchnama immediately jalgaon news)

जळगाव जिल्ह्यातील विशेषतः रावेर तालुक्यातील मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लावलेल्या केळीच्या रोपांवर सीएमव्ही या विषाणूजन्य रोगाचे आक्रमण झाले आहे. ही रोगग्रस्त खोडे उपटून फेकून दिल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय नाही. या केळीसाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्रती खोड ५० रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.

तालुक्यातील केऱ्हाळे आणि अहिरवाडी पट्ट्यात या रोगाचा खूपच मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. 'सकाळ'ने गेल्या दोन दिवसांपासून याबाबतचे सविस्तर वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज (ता. १५) भारतीय जनता पक्षाचे शेतकरी आघाडीचे नाशिक विभागप्रमुख सुरेश धनके यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. खासदार खडसे आज रावेर तालुका दौऱ्यावर होत्या.

त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला व नुकसान झालेल्या केळीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. आज सायंकाळीच किंवा उद्या पंचनाम्याचे आदेश निघतील, असे खासदार खडसे यांनी ‘सकाळ’शी भ्रमणध्वनीवर बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT