Exam esakal
जळगाव

आचारसंहिता लागण्यापूर्वी परीक्षा घ्या; बेरोजगारांची आर्त हाक

अद्यापपर्यंत कोणत्याही पदाची परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.

रवींद्र कोलते

न्हावी (ता. यावल) : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्यसेवक, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक, लिपिक, तत्सम गट ‘क’ पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरले असून, त्या साठी अनेक पदांसाठी परीक्षा शुल्क भरले आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पदाची परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुका होऊ घातल्या असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी संबंधित पदांच्या परीक्षा घ्याव्यात, अशी आर्त हाक बेरोजगार युवकांकडून करण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभाग गट ‘ड’ या पदाचेही दोन वेळा ऑनलाइन प्रवेश प्रमाणपत्र निघाले असताना ऐनवेळी नैसर्गिक आपत्ती आल्याने तसेच नियोजन अभावामुळे या पदाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली, तसेच तलाठी पद भरतीची एकूण १०१२ जागांसाठी जाहिरात निघणार असे सरकारच्या वतीने सूचित करण्यात आले, परंतु त्या तलाठी पदांची जाहिरात सुद्धा आजपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजत असून, न्यायालयाच्या आदेशानुसार तसे झाल्यास आचारसंहितेत कोणतीही परीक्षा पद्धत राबविण्यात येत नाही (आचार संहिता लागू झाल्यास) तसेच या मुळे ऑनलाइन अर्ज केलेल्या पदासाठी परीक्षा होणार की नाही? या चिंतेने विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणात संभ्रमात असून, शासनाने जी. आर. काढून तसेच तलाठी पद भरती २०२२ जाहिरात पुढील काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तलाठी पद भरती जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी असंख्य पदवीधर युवक वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

बेरोजगारांचा प्रश्‍न गांभीर्याने घ्या

गेल्या चार वर्षांपासून या विद्यार्थ्यांसह अनेक पदवीधर युवकांनी जिल्हा परिषदेच्या अनेक पदांसाठी अर्ज केलेले असून, त्या पदांची परीक्षा घेण्यास शासनाला विसर पडला की काय? असा प्रश्न पदवीधर युवकांना सतावत असून, आज ना उद्या आपल्याला परीक्षेसाठी सूचना मिळणार या आशेने पदवीधर युवक वाट बघत असून, शासनाने या पदांच्या परीक्षा घेण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी आशा पदवीधर युवक वर्गाकडून व्यक्त होत आहे.

''मी २०१९ या वर्षी आरोग्यसेवक या पदासाठी अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद येथे परीक्षा शुल्कसह ऑनलाइन फॉर्म भरलेला असून, आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रकारची पदाची परीक्षा घेण्यात आली नाही.'' - भूषण तेली

''निवडणुकीमुळे नोकरभरती प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) औरंगाबाद, नंदुरबार येथे वेगवेगळी पदे भरली असून, परीक्षा शुल्क प्रतीपद २५० रुपयेप्रमाणे भरले असून, आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाची परीक्षा झालेली नाही.'' - प्रशांत वाणी

''मी पशुसंवर्धन विभागातील परिचर गट ‘ड’ या पदासाठी परीक्षा शुल्क भरले असून, या परीक्षेचे दोन वेळा ऑनलाइन प्रवेश प्रमाणपत्र काढून सुद्धा दोन्ही वेळेस ही परीक्षा कोल्हापूर पूरस्थितीमुळे नियोजन अभावामुळे त्या परीक्षेचा पेपर दोन्ही वेळा झाला. त्या वेळेपासून त्या पदाच्या परीक्षेची सूचना तसेच नियोजन सुद्धा नाही.'' - तुषार साळुंखे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT