Former Member of Parliament and Brigadier Sudhir Sawant while inspecting the movement of young soldiers of Vijayanana Patil Army School here. esakal
जळगाव

NDA Exam : ‘एनडीए’साठी पूर्वतयारी महत्त्वाची : निवृत्त ब्रिगेडिअर सावंत

सकाळ वृत्तसेवा

NDA Exam : आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख (Jalgaon News) उल्लेखनीय आहे.

‘एनडीए’मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे मत माजी खासदार तथा निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज येथे भेटीप्रसंगी ते बोलत होते. (Retired Brigadier Sawant statement pre preparation is important for NDA jalgaon news)

राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे सचिव विश्वनाथ माळी, नवलभाऊ प्रतिष्ठान या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रा. के. वाय. देवरे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राजेंद्र निकुंभ, प्राचार्य पी. एम. कोळी, प्रभारी कमांडन्ट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर एस. एन. पाटील, नायब सुभेदार बी. पी. पाटील, हवालदार धनराज पाटील आदी उपस्थित होते.

समिती सदस्य विश्वनाथ माळी यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्यासह महाराणी, ताराराणी यांच्याविषयी माहिती दिली. त्यांनी शिक्षकांना एसएसबीविषयी माहिती दिली.

श्री. सावंत यांनी इंग्रजी शिक्षक उमेश काटे, शरद पाटील, एस. बी. पवार, एस. एन. नगराळे या इंग्रजी शिक्षकांनी केलेल्या अध्यापन कार्याची प्रशंसा केली. सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरणांचा मसुदा तयार करण्यासाठी नागराज पाटील, उमेश काटे, ए. ए. वानखेडे, शरद पाटील, व्ही.डी.पाटील, एस.एन.महाले या शिक्षकांनी लेखी सूचना दिल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सुरवातीला आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंचालनाद्वारे आलेल्या मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर सैनिकी शाळेत देण्यात येणारे विविध प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करून दाखवली. यावेळी समितीने शालेय परिसर, होस्टेल, मेस यासह शालेय इमारतीतील आदीची पाहणी केली. सांस्कृतिक विभागप्रमुख उमेश काटे व शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

..अशी आहे मसुदा समिती

राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणाचे पुनर्विलोकन करून सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरणांचा मसुदा तयार करण्यासाठी राज्यस्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक (पुणे) हे या समितीचे अध्यक्ष असून, या समितीत राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,

राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे सचिव विश्वनाथ माळी यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक, सातारा सैनिकी शाळेचे प्राचार्य, आर्मी वेल्फेअर सोसायटी अथवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी खडकवासल्याचे प्रतिनिधी हे समिती सदस्य असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सहसंचालक हे सदस्य सचिव राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT