Burned Tractor file photo
Burned Tractor file photo esakal
जळगाव

Jalgaon News: तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेल..! ट्रॅक्टर पेटविल्यानंतर सायंकाळी महसूलची तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आव्हाणे (ता. जळगाव) गावातून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याने ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिले. वाळू ठेके बंद असताना, अवैध वाळू सर्रास सुरू आहे.

ट्रॅक्टर पेटविल्याची घटना आपल्यावर शेकवू नये म्हणून की काय, महसूल विभागाने सायंकाळी सातला वेगळ्याच दोन ट्रॅक्टरवर गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल केला. संकटकाळात परोपकारी पोलिस दलानेही दुपारी बारच्या घटनेच्या सायंकाळी गुन्हा दाखल करून घेतला. (Revenue complaint in evening after setting tractor on fire Jalgaon News)

जळगाव जिल्‍ह्यात अवैध वाळूमाफियांवर नियंत्रण आणण्यास महसूल, पोलिस दल दोन्ही अपयशी ठरले आहेत. त्यापेक्षा वाळूचोरी थांबू नये, अशीच दोन्ही विभागांची इच्छा आहे.

परिणामी, महसूल आणि पोलिसांच्या कृपाशीर्वादानेच कोट्यवधींचा हा अवैध धंदा बाराही महिने २४ तास अविरतपणे सुरू आहे. त्याचाच प्रत्यय वारंवार येतोय. आव्हाण्यात ट्रॅक्टर पेटवून देण्याची घटना याच अतिरेकातून घडली.

काय केले, कसे झाले?

आव्हाणे गावात मंगळवारी दुपारी दोनला रिक्षाला धडक देणाऱ्या ट्रॅक्टरला ग्रामस्थांनी पेटवून आपला राग व्यक्त केला. एका मागून एक, असे दोन ट्रॅक्टर आव्हाणे बसथांब्यावर असल्याचे चित्रण सर्वदूर सोशल मीडियावरून लाइव्ह चालले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे तालुका पोलिस ठाण्यासह तहसील कार्यालयाची भंबेरी उडाली. तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी रामकृष्ण कुंभार होते नव्हते तेवढा पोलिसांचा फौज-फाटा घेत घटनास्थळावर धडकले.

महसूलच्या अधिकाऱ्यांची मात्र हिंमत होईना. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच फोनाफानी करून कानोसा घेतला. ट्रॅक्टर पेटविल्याचा व्हिडिओ देशभर व्हायरल होत असताना, प्रशासनाची बदनामी नको म्हणून आम्ही अवैध वाळू वाहतूकदार आणि नदीपात्रातून वाळू उत्खनन करणाऱ्यांवर दोन तासांपूर्वीच कारवाई केली, तरी घटना घडते.

त्यात आमचा काय दोष, या आविर्भावात तालुका पोलिस ठाण्यात वाळूचोरीची तक्रार सायंकाळी सातला देण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘ती’ तक्रार अशी, कशी?

आव्हाणे येथीलच रहिवासी तथा महसूल खात्याचे कोतवाल किशोर शालिग्राम चौधरी (वय ३६, रा. अहमदाबाद वाडा, आव्हाणे) तक्रार देतात. आव्हाणे शिवारातील नदीपात्रात स्मशानभूमीजवळून गौण खनिज उत्खनन सुरू असल्याबाबत चौधरीसाहेब दोन नंबर ट्रॅक्टरवर दुपारी साडेबाराला कारवाई करतात.

मात्र, त्या कारवाईची तक्रार सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी तालुका पोलिसांत दिली जाते. ट्रॅक्टर पेटविल्याची घटना पाहता कोतवाल चौधरींना आव्हाणे ते जळगाव येण्यास सात तास वेळ लागला का? त्यांनी दुपारी साडेबाराला नदीपात्रात दुसऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केलीयं, तर मग हे पेटवून दिलेले ट्रॅक्टर तीनला वाळू भरून आले कसे?

की फक्त दोनच वाहनांवर कारवाई करून इतरांना वाळू चोरीची मुभा होती? कोतवाल चौधरी आणि ज्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तो ट्रॅक्टरमालक शेख रऊफ शेख युसूफ असे दोघेही आव्हाणे गावातीलच रहिवासी, हे विशेष.

कोतवाल चौधरी आव्हाणे येथेच वास्तव्यास असताना, तेथून अवैध वाळू कोणाच्या आशीर्वादाने वाहिली जाते, असे बाळबोध प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येणे सहाजिक आहे.

कातडी बचाव भूमिका

इंग्रज राजवटीत महसूल चोरणाऱ्यांची महसूल अधिकारी-पोलिसांकडून चाबकाने कातडी सोलून काढली जाई. अर्थात तो अत्याचार होता सामान्य जनतेवर.

त्याच इंग्रजी धाटणीचा कारभार असलेल्या महसूल-पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचारीच सर्रास वाळूचे हप्ते घेत असतील, मग कारवाई होणार तरी कशी? घडलेल्या घटनेमुळे राज्यभर बदनामी नको.

पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. मग आपली कातडी बचाव धोरणांतर्गत महसूलतर्फे वाळूचोरीची तक्रार दिल्याची चर्चा आव्हाणे ग्रामस्थांत रंगली आहे.

ट्रॅक्टर पेटविल्याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल

आव्हाणे (ता. जळगाव) गावात वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिली होती. यात रिक्षाचालकासह तीन महिला जखमी झाल्या होत्या. या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन वाळूचे ट्रॅक्टर पेटवून दिले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नऊ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आव्हाणे गावात मंगळवारी (ता. ९) दुपारी दोनच्या सुमारास ट्रॅक्टरचालक सुनील अशोक पाटील हा ट्रॅक्टर (एमएच १९, डी ६३५४) मधून विनापरवाना वाळू वाहतूक करीत होता. त्या वेळी ट्रॅक्टरने प्रवासी रिक्षा (एमएच १९, सीडब्ल्यू १४१३) ला जोरदार धडक दिली.

या धडकेत रिक्षाचालकासह तीन प्रवाशी महिला जखमी झाले होते. अपघाताच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पेट्रोल ओतून दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले होते. पोलिस नाईक अतुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक सुनील अशोक पाटील, ट्रॅक्टरचालक रेवसिंग ऊर्फ राहुल वीरसिंग बारेला या दोघांसह ग्रामस्थ जगदीश बाबूलाल ढोले, देवेंद्र दत्तात्रय पाटील, किरण पांडुरंग ढोले,

काशीनाथ शिवाजी ढोले, सय्यद इकबाल सय्यद गफार आणि शेख रऊफ शेख युसूफ (सर्व रा. आव्हाणे ता. जि. जळगाव) यांच्या विरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून ट्रॅक्टर पेटवून दिल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री अकराला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक नयन पाटील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT