Summer Season : वाढत्या पाऱ्याने जिवाची लाहीलाही; धुळे शहरासह जिल्ह्यातील चित्र

Summer Season
Summer Seasonesakal

Summer Season : यंदाच्या उन्हाळ्यात मे सुरू झाल्यानंतर उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या आठ दिवसांचा विचार केला तर तापमानाचा पारा वाढताच आहे. त्यामुळे दिवसा प्रचंड ऊन व रात्री उकाडा यामुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने त्रासात भरच पडत आहे. तापमानाचा पारा असाच चढता राहिला तर हा त्रास आणखी वाढणार आहे. (Summer Season Rising mercury Picture of district with Dhule city)

धुळ्यातील उन्हाळा दर वर्षी केवळ घामच फोडत नाही तर अक्षरशः जिवाची लाहीलाही होते. यंदा उन्हाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीपर्यंत धुळे शहरासह जिल्ह्यात कुठेना कुठे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ-वारा असे वातावरण होते.

त्यामुळे तापमानाचा पारा खाली होता. परिणामी उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही. दुसरीकडे या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला.

दरम्यान, मे महिन्यात तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाळ्याचा फटकाही बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. सकाळी नऊ-दहानंतरच घराबाहेर पडणेदेखील मुश्कील होते अशी परिस्थिती आहे. दुपारी तर उन्हाचा तडाखा सहन होत नाही अशी स्थिती असते.

त्यामुळे घराघरात तसेच शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये पंखे, एसीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी केवळ पंखे आहेत त्यांना मात्र गरम हवेचा फटका सहन करावा लागतो. एसी, कूलर असलेल्यांना दिलासा मिळतो पण अगदी रात्री उशिरापर्यंत ते सुरू ठेवावे लागतात.

अनेक ठिकाणी तर रात्रभर कूलर चालतात. ज्यांच्याकडे एसी, कूलरची सुविधा नाही त्यांची दिवसा तर कसरत होतेच पण रात्रीही त्यांना प्रचंड उकाडा, गरम हवेचा सामना करावा लागतो. पहाटे-पहाटे थोडी थंड हवा सुरू होत नाही तोच पुन्हा सूर्य उगवल्यानंतर उन्हाच्या झळा सुरू होतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Summer Season
LIVE Marathi News Updates: 'सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंची शिंदे- फडणवीसांवर टीका

बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट पाहायला मिळतो. रस्त्यावर छोटामोठा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. थंडपेयांच्या दुकानांमध्ये मात्र गर्दी पाहायला मिळते.

उन्हाच्या या तडाख्यामुळे अनेक जण सकाळीच भाजीपाला व इतर आवश्‍यक सामान घेऊन येताना पाहायला मिळत आहे. तापमानाचा हा पारा असाच चढता राहिला तर त्रास पुन्हा वाढणार आहे. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणेही आवश्‍यक आहे.

गेल्या आठ दिवसांतील पारा असा

तारीख...कमाल-किमान (अंश सेल्सिअसमध्ये)

३ मे...३५.०-२०.०

४ मे...३६.०-२१.०

५ मे...३६.०-१९.०

६ मे...३८.०-२२.४

७ मे...४०.०-२१.२

८ मे...४१.०-२५.५

९ मे...४१.०-२२.५

१० मे...४२.०-२२.६

Summer Season
Nashik: पावसाळा संपल्यानंतरच रस्ते खोदण्यासाठी परवानगी; फोडताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com