revenue workers strike update Discussion with Divisional Commissioners jalgaon  Sakal media
जळगाव

महसूल कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

विभागीय आयुक्तांशी चर्चानिष्फळ; कामे खोळंबली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेप्रमाणे आज नाशिक विभागीय महसूल आयुक्तांशी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. मात्र मागण्या मान्य करणार असेल तर चर्चा करू, आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

अशा आहेत मागण्या

बराच कालावधी होऊनही त्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांकडून सोमवारपासून (ता.४) निदर्शने व घोषणाबाजी करीत बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. काल (बुधवारी) महसूलमंत्री थोरात यांनी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आढावा घेतला. गुरुवारी (ता. ७) सर्व विभागीय आयुक्तांना आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करून अहवाल देण्यास सांगितला होता.त्यानुसार विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली. त्यात बोलणी फिस्कटली. यामुळे संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले.आंदोलनात महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, शिपाई संवर्गातील कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे.

सर्वच शासकीय कामे ठप्प झाल्याने नागरिकांच्या फेऱ्या वाया जात आहेत. जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा महसूल वाहनचालक संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. मे २०२१ अन्वये राज्यस्तरीय केलेला नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, महसूल साहाय्यक (लिपिक) रिक्त पदांसाठी तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अव्वल कारकून (वर्ग ३)च्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश परदेशी, कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, भाऊसाहेब नेटके, प्रवीण भिरूड, अतुल जोशी आदींनी संपात सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT