Ongoing asphalting of road at Court Chowk. esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर रस्त्यांची कामे सुरू, आता खंड नको!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शहरातील रस्त्यांच्या काही कामांना का होईना, सुरवात झालीय. सोमवारी कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावरील डांबरीकरणास सुरवात झाली. यासह अन्य रस्त्यांची कामेही सुरू झाली असून, आता त्यात खंड नको, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (road works start at court to ganesh colony Latest Jalgaon News)

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

गेल्या सात ते आठ वर्षांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकाऱ्यांनी अनेकदा वल्गना करूनही कामे मार्गी लागली नाहीत. अखेरीस या कामांना काही दिवसांपूर्वी मुहूर्त लागला. त्यास कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामापासून सुरवात झाली.

गेल्या आठवड्यात कोर्ट ते गणेश कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर कोर्टापासून खडी टाकण्यास सुरवात झाली होती. सोमवार (ता. २८)पासून या रस्त्यावर डांबरीकरण सुरू झाले आहे. रस्त्याच्या कामात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, तर आठवडाभरात गणेश कॉलनीपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सोबतच काव्यरत्नावली चौक ते रामानंदनगरपर्यंतच्या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, या रस्त्यावर चर्चजवळ कर्ल्व्हटचे काम सुरू झाल्यामुळे रस्त्याचे काम थांबले आहे. तेही लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

असे होईल रस्त्याचे काम

रस्त्यात मोठे खड्डे असल्यास ते ४० मिमी खडीने बुजविण्यात येतील. या पद्धतीने पॉट होल्स, पॅचेस भरून नंतर रस्त्याच्या त्या- त्या ठिकाणच्या अवस्थेनुसार त्यावर ‘एमपीएम’ व ‘बीएम’ करण्यात येईल. नंतर आठवडाभर या रस्त्यावर वाहतूक सुरू करून त्याची क्षमता तपासण्यात येईल. नंतरच्या टप्प्यात कार्पेट व सीलकोटचा थर येईल. शहरातील विविध रस्ते वेगवेगळ्या दुरवस्थेत आहेत. त्यानुसार त्यांच्यावर आवश्‍यकतेनुसार बदल करून डांबरीकरणाचे काम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT