Road construction esakal
जळगाव

Jalgaon : 42 कोटींच्या रस्ते कामांचा मंगळवारी शुभारंभ

कैलास शिंदे

जळगाव : कागदावरचे अनेक खाचखळगे पार केल्यानंतर शासनाच्या ४२ कोटीच्या निधीतील रस्त्याच्या कामाचा (Road works) मंगळवारी (ता. ३१) शुभारंभ होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) याबाबत आता अधिकृत माहिती दिली आहे. (Road works worth Rs 42 crore started on Tuesday Jalgaon news)

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यासह विविध भागातील रस्ते तयार करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेस ४२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. निधी महापालिकेला मिळणार असला तरी त्याचे काम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने मक्तेदारही निश्‍चित केला आहे. परंतु या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेची परवानगी आवश्‍यक होती. महापालिकेने मात्र शहरात ‘अमृत’योजनेचे काम सुरू असल्यामुळे सरसकट रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली नाही. त्यावेळी त्यांनी शहरातील चार मुख्य रस्त्याचे काम सुचविले परंतु या चारही रस्त्यावर जलवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने काम सुरू करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मक्तेदार काम करण्यास तयार असूनही ते सुरू करण्यास विलंब लागत होता.

महापालिकेकडून हिरवा कंदील

शहरातील चार मुख्य रस्त्यापैकी काम सुरू करण्यास एका रस्त्याच्या कामाला तातडीने परवानी द्यावी, असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले. महापालिकेने आता चित्रा चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, की चित्रा चौक ते अजिंठा चौफुली या मार्गावरील ‘अमृत’ योजनेचे जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करावे.

मंगळवारी काम सुरू करणार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की महापालिकेच्या बांधकाम विभागाचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. चित्रा चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत मक्तेदाराला कळविण्यात येणार आहे. मक्तेदारही काम करण्यास तयार आहे. सोमवारी (ता. ३०) बैठक घेऊन मक्तेदाराला पाचारण करून त्याला काम सुरू करण्याबाबत पत्र देण्यात येईल. मंगळवारी (ता.३१) रोजी या रस्त्याचे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्यात येईल.

"चित्रा चौक ते अजिंठा चौफुली रस्त्यावरचे अमृत योजनेच्या जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करावे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहे." - विलास सोनवणी, शहर अभियंता, महापालिका

"महापालिकेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर आम्ही मक्तेदारास रस्त्याच्या कामास तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मक्तेदारानेही तयारी केली आहे. सोमवारी (ता. ३०) बैठकीत त्याला त्या कामाचे पत्र देण्यात येईल मंगळवारी काम सुरू होईल."

- गिरीश सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT