Sand Tractor Seized esakal
जळगाव

SAKAL Impact : विनाक्रमांकाचे अवैध वाळूचे 3 ट्रॅक्टर पकडले; ‘सकाळ’ची दखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करणारे तीन ट्रॅक्टर सावखेडा, पाळधी- आव्हाणेजवळील हायवे बायपासजवळ जप्त करण्याची कारवाई जळगाव तहसील कार्यालयाच्या पथकाने केली. ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे आहेत. तहसीलच्या कारवाईनंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाले आहेत. ‘सकाळ’ने सोमवारी (ता. २८) ‘गिरणेतील निर्माणाधीन पुलालगतचे पात्रही ओरबाडणे सुरू’, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. (SAKAL Impact 3 illegal sand tractors without serial numbers seized jalgaon news)

यांच्या पथकाने केली कारवाई

त्याची दखल घेत तहसीलदार नामदेव पाटील व पथकाने सोमवारी दुपारी अचानक सावखेडा बुद्रुक शिवारात तहसीलदार नामदेव पाटील, वाहनचालक मनोज कोळी, तर आव्हाणे व परिसरात नायब तहसिलदार दिलीप पाटील, लिपिक परवेज शेख, तलाठी खेतमाळीस आदींनी ही कारवाई केली.

ट्रॅक्टर चालक फरारी

आव्हाणे शिवारात पथक दाखल होताच अवैध वाळू चोरणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने ट्रक्टर नदीपात्रातच सोडून पळ काढला. महसूल विभागाने जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर नदीबाहेर आणून जप्त केले.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

गिरणा पात्रातील बांभोरीजवळील पुलासभोवतालच्या वाळूउपशाने पूल ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याची स्थिती असताना, या पुलाला समांतर रेल्वेपूल व नव्याने होत असलेल्या बायपास मार्गावरील पुलालगतही नदीपात्र ओरबाडणे सुरूच आहे. हे थांबविण्यासाठी ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून वस्तूस्थिती मांडली होती.

त्यातून महामार्गावरील बांभोरी पुलालगत दोनशे मीटरपर्यंतच्या अंतरात वाळूउपशाला बंदी आहे. ती पाचशे मीटरपर्यंत वाढविण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली खरी, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उलटपक्षी आता वाळूमाफिया थेट बांभोरी पुलाला समांतर रेल्वे पुलापर्यंतच्या साईटपर्यंत पोचले असून, त्या ठिकाणाहून वाळूउपसा होत आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम म्हणून आजच्या कारवाईकडे पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT