Sand Mafia Raj jalgaon crime
Sand Mafia Raj jalgaon crime 
जळगाव

रावसाहेबांच्या साथीने बदलीनंतरही ठाण; दोघांच्या खांद्यावर वाळू ‘माफियाराज’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बोदवड तहसीलदारांनी पकडलेल्या डंपरची अदलाबदल असो, की धरणगाव तहसीलदारांनी भरलेले ट्रॅक्टर खाली करून कागदावर दाखवणे असो, तहसील कार्यालयातील एक अनुभवी रावसाहेब आणि बदली होऊनही ठाण मांडून बसलेला एक कर्मचारी अशा दोघांनी वाळूमाफियांसाठी जळगाव तहसीलमध्ये ‘जादूगरी’ चालविली आहे.

कुठलाही अवैध धंदा असो, त्याला तल्लख बुद्धीसह धारिष्ट्य लागतेच लागते. ‘रईस’ या शाहरुख खान अभिनित चित्रपटात दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये दारूचा अवैध धंदा चालविण्यासाठी लहान वयातच चित्रपटाचा नट असलेला रईस याच्यावर ‘बनिये का दिमाग और मियाँभाई की डेअरिंग’ असा संवाद खूप प्रसिद्ध झाला. अगदी तशीच गत जळगाव तहसील कार्यालयाची आहे. सहजासहजी जो कोणीच करू शकत नाही असे धारिष्ट्य (डेअरिंग) तहसील कार्यालयातील जादुगरांकडे आली आहे. त्यात एक निष्णात तरुणाला निवृत्तीला आलेल्या रावसाहेबांची जोड मिळाली आहे.

कर्मचारीच माफियांचे मित्र

जळगाव तहसीलमध्ये तसे तर बहुतेक कर्मचारी वाळूवाल्यांचे मित्र, जोडीदार आहेत. मात्र, शासकीय कामाची जबाबदारी कंत्राटी कामगारावर सोपवून पूर्णवेळ फक्त वाळू रगडून तेल काढण्याचे काम फक्त दोघांची जोडीच करू शकते. परजिल्ह्यातील या तरुण कर्मचाऱ्याची जळगाव तहसीलमधून बदली झालेली आहे. मात्र, त्याच्यावर जबाबदारी मोठी असल्याने साहेबही त्याला बदलीच्या ठिकाणी जाऊ देत नाही. तर, दुसरे अनुभवी महाशयांवर ॲन्टिकरप्शनचा ट्रॅप होऊन त्यातून सहीसलामत बाहेर निघाल्यानंतर भुसावळ आणि आता जळगावची धुरा त्यांनी सांभाळली आहे. जिल्ह्याचे राजकारण, नेते, वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत असलेली जाण, तसेच जुन्या ओळख- परिचयातून पोलिस, पक्ष पदाधिकारी सहकाऱ्यांसोबत रात्रीच्या बैठका यामुळे येणारे कुठलेली संकट असो, त्यावर लिलया मात करण्याचे कसब या रावसाहेबांना आहे. यातून तहसीलच्या संपूर्ण ‘कलेक्शन’ची जबाबदारीच या दोघांच्या खांद्यावर सोपविली गेली आहे.

बहुतांश प्रकरणात तर तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्याच्या कानालाही वारा लागत नाही अन्‌ परस्पर ‘समरी पावर’च्या परवानग्या देऊन महिन्याकाठी लाखोंची माया जमा केली जात असल्याचे तहसीलच्याच एका कर्मचाऱ्याने गुप्त माहिती दिली आहे.'जादूगारांवर कारवाईचे ढग दाटले

बोदवड तहसील प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमधून हा जादूगार गायब झाला असून, भरलेल्या ट्रॉलीचे वाळू ट्रॅक्टर पकडणाऱ्या धरणगाव तहसील कार्यालयातही सेंधमारी झाली आहे. भरलेले वाळू ट्रॅक्टर बघणाऱ्या प्रत्यक्षदर्शींना खोटं ठरवून आता तीन ट्रॉल्या खालीच असल्याचे शासकीय चौकशीत सांगितले गेले आहे. ही सर्व जादुगरी त्याच महाशयांनी घडवून आणल्याचा संशय बळवला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे संकेत दिल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT