Honorary employees of SAT Group of ST Corporation. esakal
जळगाव

Jalgaon : ‘ST’ची लोकप्रियता वाढवायला हातभार; YouTubeकडून Silver Button

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एसटी महामंडळातील नवनवीन योजना व प्रवासाचे फायदे विविध सोशल मीडियाच्‍या माध्यमातून प्रसारित करणारा समूह म्हणून सॅट समूहाची ओळख आहे. लॉकडाउननंतर एसटी सुरू झाली, तेव्हा सर्वप्रथम ‘एसटीच्या गाडीने जाऊया’ या गीताने प्रवाशांना आकर्षित केले होते. अशी विविध प्रकारे ‘एसटी’ची लोकप्रियता वाढवायला हातभार लावल्‍याबद्दल सदस्‍यांचा सन्‍मान झाला. (SAT group get Silver button from YouTube for Contributed to increasing popularity of MSRTC Latest Jalgaon News)

सॅट समूहातील सदस्यांनी राज्य परिवहन महामंडळातील विविध योजना सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत पोचण्यासाठी अतोनात प्रयत्‍न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांनी प्रसारित केलेल्या वेगवेगळे व्हिडिओंना ११ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. त्याचप्रमाणे सबस्क्राईबरची संख्याही एक लाख ३५ हजारांवर पोचली आहे. यू-ट्यूबव्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर या सर्व ठिकाणी या समूहाने एसटी महामंडळाची प्रसिद्धी केली आहे. या कार्याची दखल तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही घेतली होती.

यू-ट्यूबकडून ॲवॉर्ड

सॅट न्यूज नेटवर्कच्या सबस्क्राईबरची संख्या लक्षात घेऊन यू-ट्यूब चॅनलकडून त्यांना सिल्व्हर बटण प्रदान करण्यात आले. या बटणाचे ओपनिंग जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते झाले. कामगार सेनेचे विभागीय सचिव आर. के. पाटील, इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंग राजपूत, विनोद शितोळे (अध्यक्ष, मान्यताप्राप्त संघटना) यांनी मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला सत्‍कार

सॅट समूहातील एसटी कर्मचारी नंदा पाटील, गोपाळ पाटील, प्रवीण कुमावत, श्याम कुमावत, यशोदा पांढरे, ललित गायकवाड, विनायक बडगुजर, शीतल पाटील, नीलेश पिंगळे, पंडित पाटील, विनोद पाटील, शैलेश नन्नवरे, दिनेश पाटील यांचा विभाग नियंत्रक जगनोर यांनी सत्कार केला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव विभागाचा दुसरा क्रमांक आल्याबद्दल विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचाही सामूहिक सत्कार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT