Cannabis Plants Cannabis Plants
जळगाव

शहादा : बारा लाखांची गांजाची झाडे मलगाव येथे जप्त

सुमारे ११ लाख ९० हजार रुपयांची, १७० किलो वजनाची २५० गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

शहादा : मलगाव (ता. शहादा) येथे कपाशीच्या शेतात सुमारे ११ लाख ९० हजार रुपयांची, १७० किलो वजनाची २५० गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या आठवड्याभरात ही दुसरी कारवाई असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे उघडकीस येत आहे. या घटनेतील संशयित फरारी झाला आहे.

तालुक्यातील मलगाव शिवारात अजय सुभाष पटले यांच्या शेतात छापा टाकला असता, तेथे कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे मिळून आले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. गांजाची शेती करणे बेकायदा असतानाही अजय पटले यांनी त्यांच्या शेतात गांजाची लागवड केली. पोलिसांनी १७० किलोची २५० लहान-मोठी गांजाची झाडे जप्त केली. त्यांची किंमत सुमारे ११ लाख ९० हजार रुपये आहे. शेतमालक अजय सुभाष पटले यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्याखाली शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार मेहरसिंग वळवी, दिनकर चव्हाण यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT