Suspect Kishore Suryavanshi assaulting a teacher in the premises of AGC English Medium School.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विद्यार्थ्यांच्या किरकोळ भांडणावरुन शिक्षकास टोळक्याकडून बेदम मारहाण; पोलिसांना धक्काबुकी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील वरणगाव रस्त्यावरील संभाजीनगर, एजीसी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात शुक्रवारी (ता.४) सकाळी अकराला शाळेतील पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून विद्यार्थिनीचे नातेवाइकांसह तीन ते चार जणांच्या टोळक्याने शाळेतील शिक्षक आशिष लता साहोत (रा. संभाजीनगर, भुसावळ) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. (teacher was brutally beaten by gang at school Jalgaon Crime News)

दरम्यान, त्यानंतर या टोळक्याने शंभर, दीडशे जणांचा जमाव पोलिस ठाण्यात आणून शिक्षकासह घेरले व मारहाण केली. पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेत विद्यार्थिनीचे नातेवाईक संशयित किशोर सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, छोटू सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी व दोन ते तीन अनोळखी जणांनी मारहाण केल्याची फिर्याद देण्यासाठी शिक्षक आशिष लता साहोत हे बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले असता संशयितांसह शंभर ते दीडशे जणांचा जमाव त्या ठिकाणी चालून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी शिक्षकाला पोलिस ठाण्यात सुद्धा मारहाण केली. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा धक्काबुक्की केली. या दरम्यान काही पोलिस कर्मचाऱ्यांनी सरळ पोलिस ठाण्याबाहेर पळ काढला.

बाजारपेठ पोलिस ठाण्यात दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव जमून त्यांनी धुडगूस घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...

Latest Marathi News Live Update : इंडिया आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला: अमित शहा

Lucky Plants for Home : कुंडीत लावा 'ही' 2 युनिक झाडे! घराकडे खेचतात पैसा; उघडतात यशाची दारे, पण रोपटं लावताना करू नका एक चूक

SCROLL FOR NEXT