जळगाव

धानोरा जि. प. शाळेतील शिक्षक कोरोना बाधित

सकाळवृत्तसेवा

धानोरा : धानोरा  ता.चोपडा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील एक शिक्षक कोरोना बाधित असूनही गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शाळेत येत असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. दरम्यान समाजासमोर आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशातील व्यक्ती कडूनकोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराप्रती निष्काळजीपणा पाहून संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना मुळे प्राथमिक शाळा बंद असल्या तरी ही शिक्षकांना शाळेत हजेरी लावणे क्रमप्राप्त आहे. धानोरा येथील जि.प.शाळेत ही शाळेच्या इतर शैक्षणिक कामानिमित्त शाळेत मुख्याध्यापक सहित आठ ते दहा शिक्षक हजेरी लावतात. सर्व शिक्षकांना वेळोवेळी कोविड19 ची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले असूनही धानोरा शाळेतील एका शिक्षकाने आठ ते दहा दिवसांपासून टेस्ट करूनसुद्धा रिपोर्ट बाबत गंभीर्य लक्षात न घेता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असून देखील बाहेरगावाहून येजा सुरूच ठेवून शाळेतील शिक्षकांसह ग्रामस्थानाही संसर्गाचा धोका निर्माण केला आहे. 

शिक्षकाची बेपरवाईने खळबळ
धानोरा जि.प.शाळेतील शिक्षक कोरोना बाधित असूनसुद्धा गेल्या काही दिवसांपासून शाळेत येऊन इतर शिक्षकांच्या संपर्कात येत राहिले. त्यांच्या या बेपरवाई कारभारामुळे शाळेतील शिक्षकांसहित ग्रामस्थांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


पोलिस पाटलांची सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
 
धानोरा जि. प. शाळेत एक शिक्षक कोरोना बाधित असल्याचे गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांना त्यांच्या खास सूत्रांकडून माहिती मिळाली होती.  पोलिस पाटील सकाळी शाळेकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना कोरोना बाधित शिक्षक शाळेत प्रवेश करीत असताना दिसले श्री पाटील यांनी त्या शिक्षकास समज देत विचारणा केली असता शिक्षकाने त्यांना मला पॉझिटिव्ह बाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने मला काहीच त्रास जाणवत नसल्याचे त्या शिक्षकाने अनभिज्ञ पणे उत्तरे दिली. पोलिस पाटील यांनी त्या शिक्षकास घरीच विलगिकरण होण्याचा सल्ला देत घरी पाठवले.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT