Bhusawal: Police officers while investigating the incident
Bhusawal: Police officers while investigating the incident esakal
जळगाव

Jalgaon News : व्यवस्थापकाचा कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला; संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरातील मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी चक्क व्यवस्थापकाने कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. दरम्यान, सोमवारी (ता.२१) बँकेचे ऑडिट सुरू असताना तफावत आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरात मणप्पुरम गोल्ड लोनचे कार्यालय आहे. या ठिकाणी सोने तारण ठेवून ग्राहकांना कर्जपुरवठा केला जातो. मणप्पुरम गोल्ड लोनच्या या शाखेत जवळपास दोन हजारांवर ग्राहक आहे. यातील बहुतांश ग्राहकांनी सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. (Theft crores of gold by Manager Manappuram Gold Loan branch type Teams have been dispatched to search for suspect Jalgaon News)

मणप्पुरम गोल्ड लोनच्या भुसावळ शाखेत दोन महिन्यापूर्वीच उत्तर प्रदेशातील या संशयित व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, व्यवस्थापक बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले ग्राहकांचे अंदाजे कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन फरारी झाला आहे. बँकेचे ऑडिट सुरू असताना ही तफावत व्यवस्थापनाच्या लक्षात येत बँकेच्या व्यवस्थापकावर संशय व्यक्त करत बँक प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली आहे.

ही घटना शनिवारी सात ते सोमवार दहाच्या दरम्यान घडली असून, व्यवस्थापकाने गहाण ठेवलेले अंदाजे कोट्यवधी रुपयांचे सोने चोरून नेल्याची प्राथमिक माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. पोलिसांनी बँकेची पडताळणी केली. बँकेमध्ये सोन्याचे दागिन्यांचे एकूण १२६० पाकिटे असून, त्यापैकी १६ ते १७ पाकिटे चोरीला गेली आहेत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांचे पथक संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

‘सीसीटीव्ही’ केले बंद

सीसीटीव्हीची तपासणी केली असता बँक व्यवस्थापकाने चोरी करण्यापूर्वीच बंद केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पथकाने मणप्पुरम गोल्ड लोनच्या भुसावळ शाखेला भेट देत पाहणी केली.

"संशयिताच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. ही घटना नियोजित होती की पूर्वनियोजित होती या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. घडलेल्या घटनेत इतर साथीदारांचा समावेश आहे का? त्या दिशेने कसून तपास करीत आहोत."

- सोमनाथ वाघचौरे

उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT