जळगाव

चक्क ! पालिकेचा वीजपंपच चोरीला; शहरावर पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे संकट 

राजू कवडीवाले

यावल : येथील पालिकेच्या साठवण तलावातून दोन वीजपंप आणि केबल, तसेच याच भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील दोन वीजपंप असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवले. यात सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याबाबत येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांनी पांढऱ्या रंगाचे छोटा हत्ती (मालवाहू वाहन) वापरल्याचे समोर आले आहे. साठवण तलावातून पंप चोरी गेल्याने शहरातील पाणीपुरवठादेखील विस्कळित होणार आहे. 


शहरातील बोरावल रस्त्यावर पालिकेचा साठवण तलाव आहे. या साठवण तलावावरून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचविण्यासाठी ३० (एच.पी.) अश्वशक्ती क्षमतेचे दोन वीजपंप होते. या दोघा पंपाची किंमत सुमारे तीन लाख रुपये होती. तर या दोघा पंपास विद्युत जोडणीस ६० मीटर केबल होती. जिची किंमत ५५ हजार रुपये होती. स्टार्टरसह कटआउट आदी साहित्यांचे सुमारे सव्वा लाख रुपयाचे नुकसान देखील या चोरट्यांनी केले आहे. पालिकेचे तीन लाख ५५ हजारांचे साहित्य चोरी गेले आहे. तलावाच्या जवळ असलेल्या शहरातील डॉ. सतीश यावलकर यांच्या शेतातून एक १० (एच.पी.) अश्वशक्ती व पाच(एच.पी.) अश्वशक्तीचा असे ४५ हजार रुपये किमतीचे दोन पंपदेखील चोरट्यांनी रात्रीच लांबवले. 

ठसेतज्ज्ञ, डीवायएसपींची भेट 
घटनास्थळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिंक पथक, ठसेतज्ज्ञचे पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी नमुने घेतले आहे. तसेच येथे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी देखील भेट दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत येथे पालिकेचे १८ कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचविण्याच्या दृष्टीने व शहरास पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी कामाला लागले होते.  
 

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT