Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील दशरथनगरातील नवीन घराच्या बेडरूमची खिडकी तोडून चोरट्याने घरातील १ लाख १९ हजारांचे दागिने लंपास केले. चोरट्याने नेमके दागिने ठेवलेलेच कपाट फोडले असून, पोलिसांना परिचितांवर संशय आहे.

विपुल भारंबे (वय ३२) यांची असोदा शिवारातील शेतजमिनीचे राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने संपादन केले. शेजमिनीचा मोठा मोबदला त्यांना काही महिन्यांपूर्वीच मिळाला आहे. पूर्वी विपुल भारंबे जिल्‍हा दूध उत्पादक संघात कार्यरत होते.

आता शेती करतात. ११ ते १८ मार्चपर्यंत विपुल कुटुंबीयांसह चाळीसगाव येथे गेले होते. चोरट्याने त्यांच्या नव्या घराच्या बेडरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील काढून आत प्रवेश केला. दागिने ठेवलेल्या नेमक्या त्याच कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी जवळपास १ लाख १९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चांदीचे दागिने मात्र तसेच ठेवले. त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य जसेच्या तसेच असल्याचे आढळून आले.

श्री. भांरबे यांनी तक्रार दिल्यावर शनिपेठ पोलिसांसह, गुन्हेशाखा, श्वान-ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यावर भारंबे यांच्या घराची इत्यंभूत माहिती असलेल्या चोरट्याने घबाड मिळण्याच्या उद्देशाने चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय; बांधकाम क्षेत्राला दिलासा

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT