Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : शेती पाइपलाइनसाठी आणलेल्या उसनवार पैशांवर चोरट्यांचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : बोळे (ता. पारोळा) येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात पाइपलाइनसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून व हात उसनवारी आणलेले पावणेदोन लाखावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.

बोळे येथील दरबारसिंग झगेसिंग गिरासे यांनी शेतामध्ये पाइपलाइन करायची होती, त्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून एक लाख रुपये रोख उसनवार घेतले होते व आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून सत्तर हजार रुपये मिळाले होते. सदर रक्कम त्यांनी आपल्या घरातील गोदरेज कपाटामध्ये ठेवली होती. (Thieves seized usanwar money bought for agriculture pipeline Jalgaon Crime News)

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

१० रोजी ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी घराच्या बाहेर धुणे धुत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत घरात घुसून व घरातील कपाटातील ठेवलेली एक लाख सत्तर हजार रुपये रक्कम लंपास करून पसार झाल्याची घटना घडली आहे.

भरदिवसा दुपारच्या सुमारास घरात लोक असताना देखील अशा प्रकारच्या चोरी होत असल्याने ग्रामीण भागातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जयवंत पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT