Tractor thieves arrested esakal
जळगाव

चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकासह ट्रॅक्टर ताब्यात

डिकसई शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : डिकसई शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालाय.

जळगाव तालुक्यातील डिकसाई शिवारात असलेल्या तापी नदीपात्रातून काही जण वाळूची चोरी करत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यानुसार कारवाईच्या सूचना दिल्यात. यावेळी पोलिस कर्मचाऱ्‍यांनी बुधवारी (ता. २५) दुपारी १२ वाजता डिकसाई शिवारातील तापी नदीपात्रात गेले असता वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ३९८६) आढळून आले. ट्रॅक्टरचालक मुकूंदा साळुंखे (रा. कोळन्हावी, ता. यावल) याला वाळू वाहतुकीचा परवानाची विचारपूस केली असता ट्रॅक्टरचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय दुसाने हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT