Transfers esakal
जळगाव

Jalgaon Employee Transfer : जिल्ह्यातील 88 महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हाधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी तब्बल ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे केल्या. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता. ३०) सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले होते. (Transfers of 88 revenue employees in district jalgaon news)

प्रत्येक कर्मचाऱ्यांना बोलावून त्याचे समुपदेशन करीत बदल्या झाल्या. इच्छित ठिकाणी बदल्या केल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना संबंधितांचे समुपदेशन, त्यांना हवे असलेले गाव, घर व आरोग्याच्या अडचणी आदी बाबींचा विचार करून बदल्या करण्याबाबत आदेश काढले आहेत. ८८ महसूल कर्मचाऱ्यांचे समुपदेशन झाले. त्यांच्या अडचणी समजून बदल्या करण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रात्री उशिरापर्यंत आदेश काढण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होते. महसूल प्रशासनात मे महिन्यात बदली प्रक्रिया राबविली जाते. यंदाही महसूल प्रशासनात समुपदेशन पद्धतीचा अवलंब करून बदल्या झाल्या. एकाच ठिकाणी तीन वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांची खांदेपालट झाली.

कोणाला कोणता टेबल मिळतो, याविषयी आता चर्चा संपली आहे. अव्वल कारकून, मंडलाधिकारी, महसूल सहाय्यक आणि वाहन चालक, अशा चार संवर्गातील ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात ९ अव्वल कारकून, १२ मंडल अधिकारी, ६३ महसूल सहाय्यक आणि ४ वाहनचालकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

जळता बकरा अन् कपाळी कुंकू... लखाबाई बनून आलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवलाय छोटा पडदा

SCROLL FOR NEXT