Valentine Day
Valentine Day  esakal
जळगाव

Valentines Day 2023 : व्हॅलेंटाइन डे’ अन् 20 जण अडकणार लग्नाच्या बेडीत!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘व्हॅलेंटाइन डे’ (Valentines Day) म्हणजे युवकांसाठी प्रेमाचा उत्सव. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो.

पण हा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी लग्नाचा धूमधडाका उडवण्याची क्रेझ वाढली आहे. (Valentines Day On February 14th craze of making grand wedding on increased Jalgaon news)

या दिवशी पंचांगानुसार लग्न मुहूर्तही असल्याने ‘शुभमंगल’ म्हणत अनेक जोडपी बोहल्यावर चढणार आहेत. तर दुसरीकडे नोंदणी पद्धतीनेही विवाहाला पसंती मिळत असून, या वर्षी जळगावमध्ये २० प्रेमी युगल ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत कैद होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारी (ता. १४) ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी प्रेमीयुगलांची तयारीही पूर्ण झाली आहे.

विवाहाचा योग

कोरोना महामारीचे निर्बंध उठल्याने यंदा १४ फेब्रुवारीला निर्बंधमुक्त वातावरणात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी अनेक जण विवाह बंधनात अडकणार आहेत. अनेक मंगल कार्यालये या दिवशी गजबजणार आहेत.

जोडप्यांना जास्त वेळ ताटकळत न ठेवता त्यांचा हा दिवस खास बनविण्यासाठी नोंदणी कार्यालयही सज्ज आहेत. दरम्यान, १४ फेब्रुवारीला विवाहाचा चांगला योग आहे. पंचांगानुसार विवाह मुहूर्तही आहेत. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नाचा धूमधडाका उडणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ग्रीटिंग कार्ड

छोटे ग्रीटिंग कार्ड अगदी ५० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. टेडीवेअरलाही चांगली मागणी आहे. छोटा टेडी २५०, २०० ते पुढे ५०० व हजार रुपयांपर्यंत प्रेमाचा संदेश देणारे शुभेच्छापत्र,

हार्ट शेपचे चॉकलेट, केकही हार्ट शेपचा, लाल गुलाबांनाही हृदयाचा आणाभाका अन् सोबत एखादी भेटवस्तू. ‘व्हॅलेंटाइन डे’साठी तरुणाईचा बेत पक्का झाला असून, त्यासाठी दुकाने, बाजार सज्ज झाले आहेत.

सध्या ऑनलाइन शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काळाच्या ओघात शुभेच्छा संदेश देणारे ग्रीटिंग कार्ड मागे पडले.

पण ‘व्हॅलेंटाइन डे’ला भेटवस्तूसोबत प्रेम संदेश देणारे ग्रीटिंग आवर्जून दिले जाते, म्हणून इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी ग्रीटिंग कार्डला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले, हार्ट शेप, चौकोनी आकार,

फोल्डिंग ग्रीटिंग व त्यावर प्रेमाविषयीचा छानसा संदेश, कुठे गुलाबाची प्रिंट असलेले ग्रीटिंग, तर हार्टमध्ये नाव टाकून मिळणारे ग्रीटिंग अशा अनेक प्रकारच्या ग्रीटिंगने दुकाने सजली आहेत.

"गेल्या वर्षी कोरोनाचे सावट कमी झालेले असले तरी ११ जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला लग्नाचा बार उडविला होता. या वर्षी आता हे प्रमाण वाढलेले आहे. १४ फेब्रुवारीस सुमारे २० ते २५ जोडपी विवाह करतील. ७० ते ८० जोडप्यांनी नोंदणी केली आहे." -संजय ठाकरे, विवाह अधिकारी, दुय्यम निबंधक १, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT