भाऊ...‘वसाका’ पुन्हा बहरेल का? sakal News
जळगाव

भाऊ...‘वसाका’ पुन्हा बहरेल का?

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; मंथन होणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

कासोदा (ता. एरंडोल) : जिल्ह्यातील सात  तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला आणि ४२१ गावातील चौदा हजारांवर सभासदांच्या मालकीचा २८२ एकर शेतजमिनीत वसलेला वसंत सहकारी साखर कारखाना आज भंगारखाना बनला आहे. एकेकाळी १ हजार २५० टन गाळप क्षमता असलेला व सातशे कामगारांचा उदरनिर्वाह करणारा हा कारखाना राजकीय इच्छाशक्तीअभावी एक शोकांतिका बनला आहे. जिल्ह्यात ‘चोसाका’ला ऊर्जितावस्था प्राप्त होत असतानाच आता कामगारांसह शेतकऱ्यांचे डोळे ‘वसाका’कडे लागले आहेत. मात्र, त्यासाठी राजकीय स्तरावर मंथन होणे गरजेचे आहे.

वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९७३ मध्ये झाली. तर १९७६ ते १९७७ ला पहिले गाळप झाले. तेव्हापासून १९९८ ते १९९९ पर्यंत पूर्ण क्षमतेने गाळप झाले. त्यानंतर वसाका बंद झाला. नंतर पुन्हा २००७ ते २००८ या वर्षी गंगामाई शुगर फॅक्टरीला वसाका भाडेतत्त्वावर चालवायला दिला. त्यांनी देखील एकाच वर्षात सर्व सामान गुंडाळून काढता पाय घेतला.

नवा कोरा ‘डिस्टिलरी प्लांट’

या कारखान्याचा स्वतःचा ३० हजार लिटर क्षमता असलेला नवा कोरा डिस्टिलरी प्लांटही आहे. त्यात गंगामाई शुगर इंडस्ट्रीजने २००७ ते २००८ या वर्षी मशीनरित वाढ करून ३० हजार लीटरची क्षमता ४० हजारापर्यंत वाढविली. या कारखान्यावर जवळपास १८ ते १९ कोटी रुपये कर्ज होते. त्याच्या व्याजाचा जर हिशेब केला तर ते ५० ते ६० कोटीच्या आत बाहेर असू शकते. या कर्जामुळे गेल्या ४९ वर्षांत एकाही सभासदाला विकत घेतलेल्या एक हजार रुपयांच्या भागावर लाभांशाच्या रूपात एक दमडीही कारखान्याकडून मिळाली नाही. तरी देखील सभासदांनी त्यासाठी कधीही अट्टहास केला नाही. कारखाना मागील काळात झालेला अनागोंदी कारभार व भक्कम नेतृत्वाच्या अभावामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे.

कामगार, शेतकरी देशोधडीला

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी मातीमोल भावात दिल्या होत्या. ते आज देशोधडीला लागले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ते हवालदिल होऊन भटकंती करत करत वयस्कर होऊन गेले. काही मृत झाले तर काही वणवण भटकत आहेत. तर काहींच्या मुला-मुलींचे शिक्षण देखील अपूर्णच राहिले. वसाका बंद पडायला काही प्रमुख कारणे आहेत, त्यात प्रामुख्याने वारेमाप नोकरभरती, नियोजनाचा अभाव, आवश्‍यकतेपेक्षा जास्त सामानाची खरेदी यामुळेच वसाका डबघाईला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT