जळगाव

जिथे आहात तिथूनच द्या नवदाम्पत्याला आशीर्वाद ! कोरोना जनजागृतीचा अनोखा पॅटर्न 

चेतन चौधरी

भुसावळ :  कोरोनामुळे आपण सुरक्षित रहा...अन् आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या असे आवाहन करून आपण आहात तेथूनच नवदाम्पत्याला आशीर्वाद द्या असे आवाहन करणारी विवाह पत्रीका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. जामनेर येथील माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांची कन्या सायली व कुऱ्हे पानाचे येथील मुख्याध्यापक प्रभाकर पाटील ( हल्ली मुक्काम जामनेर ) यांचे पुत्र स्वप्निल यांचा विवाह सोहळा 28 रोजी जामनेर येथे पार पडत असून, या विवाहाच्या पत्रीकेत कोरोनाच्या आपत्तीतील नियमांचे पालन करत समाजाचे प्रबोधन करण्यात आलेले आहे. यामुळे समाजातून याबाबत कौतुक केले जात आहे.

विवाह हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा मंगल सोहळा असल्याने तो आपापल्या परीने भव्य दिव्य साजरा करण्याचे प्रयत्न सर्वच जण करत असतात. गत मार्च महिन्यापासून कोविडच्या संसर्गामुळे विवाह सोहळ्यांना आटोपशीर पध्दतीत साजरे केले जात आहे. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्यामुळे विवाह मोठ्या धुमधडाक्यात साजरे होऊ लागले होते. या अनुषंगाने जामनेरातील माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांची कन्या चि.सौ.कां. सायली व कुऱ्हे पानाचे  येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांचे पुतणे तथा जामनेरातील मुख्याध्यापक प्रभाकर पाटील यांचे चिरंजीव स्वप्नील यांचा विवाह नियोजीत करण्यात आल्याने याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. यासाठी नातेवाईकांसह स्नेह्यांना तसेच राजकिय , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रीत करण्यात आले होते.

प्रशासनाच्या नियमांचे पालन
तथापि, ही सर्व लगीनघाई सुरू असतांना अचानक नव्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. यामुळे पुन्हा एकदा विवाहादी सोहळ्यांवर नव्याने निर्बंध लादण्यात आले असून रात्रीची संचारबंदी सुध्दा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे वर व वधू या दोन्ही कुटुंबांनी आपल्याकडचा विवाह साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेली पत्रीका ही सोशल मीडियात व्हायरल झालेली असून ती अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
 

काय आहे पत्रिकेत ?
या पत्रिकेत नमूद केले की, कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार हा सोहळा अतिशय साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कृपया आपण आहात तेथूनच उभयतांना आशीर्वाद द्यावा  आपण सुरक्षित रहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी व  जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आम्ही पार पाडणार...!आपणही सहकार्य करावे असे आवाहन दोन्ही पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे. 

कोविडविषयी जनजागृती
या विवाह पत्रीकेवर कोविडच्या प्रतिकारासाठीची जनजागृती अतिशय समर्पक प्रकारे करण्यात आलेली आहे. यात प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी याचे पालन करण्याचे आवाहन मुलीकडून  रमाकांत पाटील, प्रकाश पाटील, विजय पाटील तर मुलाकडून प्रभाकर पाटील, भास्कर पाटील व विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT