जागतिक पाणथळ प्रदेश दिन | वाघूर धरण परिसरात ६८ प्रजातींचे पक्षी sakal
जळगाव

जागतिक पाणथळ प्रदेश दिन | वाघूर धरण परिसरात ६८ प्रजातींचे पक्षी

रेषाळ बगळा, तपकिरी खाटीकचे दर्शन; ९७२ पक्ष्यांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जागतिक पाणथळ प्रदेश दिनाच्या औचित्याने वाघूर धरण परिसरात बुधवारी पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत ६८ जातींचे मिळून एकूण ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे रेशाळ बगळा आणि तपकिरी खाटीक या हिवाळी पाहुण्यांची पक्ष्यांची नोंद झाली.

ही गणना पक्षिमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ, बाळू महांगडे यांनी केली. पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे, पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ प्रदेशच्या/जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. पाणथळ जागी पक्ष्यांच्या किती जाती आहेत व किती संख्येनी आहे त्यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरत असते. त्या दृष्टीने ही गणना करण्यात आली.

या पक्ष्यांची नोंद

गणनेत पाणथळ पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने वारकरी- २१८, छोटा पाणकावळा-९०, इतक्या मोठ्या संख्येने नोंदवण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की यांचे सोबत अल्प संख्येने गडवाल, तरंग, थापट्या, भुवई बदक, लालसरी, साधा पाणलाव, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी, काळ्या शेपटीचा मालगुजा, कंठेरी चिखला, पाणकाडी बगळा, मोऱशराटी, काळा शराटी, शेकाट्या, चिखल्या, हिवाळी सुरय, पांढुरका हरिण, उघड चोच करकोचा, आशियाई कवडी मैना, करडा धोबी, हिरवा बगळा, पांढऱ्या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, युरेशियन दलदल आदी पाणपक्षी नोंदण्यात आले.

नेहमीचे पक्षी गायब

या गणनेत अपेक्षित असणारे चक्रवाक, नयनसरी, शेंडीबदक, चमच्या, तिरंदाज, हिरवा तुतार, छोटा आर्ली, कैकर, मोठा पाणकावळा, भारतीय पाणकावळा, रंगीत करकोचा, कांडेसर हे पक्षी दिसले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला; निफ्टी 25,000च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Kolhapur Gold Silver : कोल्हापुरात सोन्या चांदीच्या दर वाढले की कमी झाले, सहा महिन्यांत दर किती वाढले?

Pune Weather Update : पुणे आणि पिंपरीत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

'कसं काय पाटील बरं हाय का?' जान्हवीच्या आईचं गाणं ऐकलं का? ऑन स्क्रीन आईचं तेजश्री प्रधाननं सुद्धा केलं कौतुक

Rinku Singh: अंडरवर्ल्डकडून रिंकू सिंगला धमकी, मागितली 'इतक्या' कोटींची खंडणी; दाऊद गँगचा हात... वेस्ट इंडिज कनेक्शन

SCROLL FOR NEXT