Death News
Death News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : फवारणीचे द्रावण घेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जरंडी (ता. सोयगाव) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्य केली. दीपक जनार्दन सुस्ते (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.जरंडीत दीपक सुस्ते पत्नी स्वाती, मुलगी प्रांजल (८), मुलगा पीयूष(वय अडीच) यांच्यासह वास्तव्यास होते. दीपक यांच्या वाट्याला दीड एकर शेती आली होती. पती-पत्नी दोघेही शेतात राबराब राबत होते.

मोसंबी आणि कापसाचा पेरा केला. मात्र, लहरी निसर्गाच्या कोपामुळे पीक येऊ शकले नाही. पेरणी, फवारणी, मजुरी, कीटकनाशके, कुटुंबाचे आजारपण, अशा वेगवेगळ्या कारणाने दीपक यांनी खासगी सावकाराकडून वेळोवेळी घेतलेले कर्ज साडेतीन लाख रुपये झाले होते. (Young farmer commits suicide by taking spray solution Jalgaon Crime News)

स्वतःचे शेत करून दीपक शेजारीच दुसऱ्या शेतातही मजुरी करू लागला. सावकाराचा पैशांसाठी लावलेला तगादा आणि शेतजमीन जाण्याच्या दडपणाखाली असलेल्या दीपक सुस्ते यांनी गुरुवारी (ता. १) दुपारी मृत्यूला कवटाळले.

दीपक गुरुवारी सकाळी लवकरच शेतात गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास फवारणी करताना, दीपक फवारणीचे द्रावण पिऊन घेतले. त्यामुळे ग्लानी येऊन पडल्यावर शेतात सोबत काम करणाऱ्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्याला उचलून जळगावच्या दिशेने धाव घेतली.

जिल्‍हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान दीपकची प्राणज्योत मालवली. तोपर्यंत त्याची पत्नी स्वाती आणि इतर नातेवात्तकांनी जळगाव गाठले. मृत्यूचे कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT