Naukri Survey 2023
Naukri Survey 2023  
Jobs

Naukri Survey 2023 : नोकर कपातीतून कर्मचाऱ्यांना दिलासा! नोकरी डॉट कॉमच्या सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

२०२३ वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर्मचारी कपात संपूष्टात येणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोठी नोकरकपात झाली होती. त्यामुळे याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला होता. दरम्यान आता नोकरकपात कमी होणार असून २० टक्के पगारवाढ देखील देण्यात येईल, अशी माहीती रोजगार पोर्टल नोकरी डॉट कॉमने दिली आहे. 

नोकरी डॉट कॉम या पोर्टलने १० क्षेत्रातील १४०० रिक्रूटर्स आणि सल्लागारांचे सर्वेक्षण केले. यामध्ये बहुतेक रिक्रूटर्सनी नोकरकपात कमी होणार असल्याचे सांगितले आहे. तर काही जणांनी ४ टक्के कर्मचारी कपात करणे पहीले ध्येय असल्याचे सांगितले. 

सर्वेक्षणात आय टी भूमिकेचा भरतीवर जास्तीत जास्त परिणाम दिसून येईल. तसेच व्यवसाय विकास, विपणन, एचआर आणि ऑपरेशन्सच्या आघाड्यांवरील भूमिकांवरही काही परिणाम दिसून येतील.

सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की जागतिक रोजगार बाजारपेठेतील अनिश्चितता असूनही ९२ टक्के कर्मचारी नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नोकरीसाठी आशावादी आहेत. सर्वेक्षण केलेल्यांपैकी जवळपास निम्म्या लोकांना नवीन आणि बदलीची अपेक्षा आहे. २९ टक्के लोकांना फक्त नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे आणि १७ टक्के लोकांना त्यांचे कर्मचारी वर्ग कायम ठेवायचे आहेत.

भारतीय कर्मचाऱ्यांना यावर्षी जास्त पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षण केलेल्या सर्व नियोक्त्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांनी सरासरी २० टक्के पगारवाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. अहवालात असे म्हटले आहे की जागतिक स्तरावर नियुक्तीबाबत सध्याची अनिश्चितता असूनही, भारतातील कॅम्पस हायरिंगबाबतची भावना आशादायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT