गवळीनगर - अर्चना यमकर व तिचे राहते घर.
गवळीनगर - अर्चना यमकर व तिचे राहते घर. 
काही सुखद

अर्चनाच्या मदतीसाठी सरसावल्या संस्था

सकाळवृत्तसेवा

मोरगिरी - गवळीनगर (ता. पाटण) येथे राहणारी मुलगी अर्चना यमकरचे दोन्हीही हात बोटांसह मनगटापर्यंत चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने तिला अपंगत्व प्राप्त झाले. अशी अवस्था असतानाही ती दोन्ही मनगटात पेन धरून दहावीची परीक्षा देत आहे. सहायक न घेता ती देत असलेल्या परीक्षेची बातमी दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यानंतर अनेक संस्था, व्यक्ती व समूह अर्चनाला आधार देण्यासाठी पुढे सरसावल्या. विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थेने संपर्क साधून तिच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचा शब्द दिला आहे.

अर्चना यमकर मोरणा विद्यालयात शिकत असून, ती दहावीची परीक्षा देत आहे. लहानपणी खेळताना रखरखते विस्तवाचे निखारे असलेल्या चुलीत हात गेल्याने दोन्ही हात जळाले. घरची परिस्थिती हलखीची असल्याने व कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने घरगुती उपाय केले. मात्र, यात तिच्या हाताची बोटे कायमची निकामी झाली. मात्र, तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. 

ती गवळीनगर ते मोरगिरी हा दीड तासाचा प्रवास दररोज पायी चालत करत आहे. शाळेबरोबर घरातील छोटी-मोठी कामे करून कुटुंबाला मदत करीत आहे. दहावीत असतानाच सहा महिन्यांपूर्वी वडिलाचे छत्र हरपले आहे. तरीही न डगमगता ती जिद्दीने शिकत आहे. तिचे दहावीपर्यंतचे शैक्षणिक वाटचालीचे प्रेरणादायी वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर मदतीपासून वंचित असलेल्या अर्चनाला विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी संपर्क साधून मदतीचे आश्वासन दिले.

सातारा व पाटण येथील शिक्षण विभागाने याबाबत सविस्तर माहिती घेऊन अर्चनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पनामा फाउंडेशनचे गणेश झेंडे, राजेंद कदम, टच अ लाइफ फाउंडेशनचे नरेश सुराना, नेहा पवार, चित्रपट अभिनेता समृद्धी जाधव यांनी अर्चनाला दत्तक घेऊन शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. जळगाव, नाशिक व मुंबई येथील सामाजिक संस्थांनी तिला मदत करणार असल्याचे सांगितले आहे. गावातील ग्रामस्थ बाळू गोरख यांनी ती ज्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे, त्याचे विस्तृत विवेचन ‘सकाळ’मध्ये वाचल्यावर त्यांना गहिवरून आले. ते मला शब्दात सांगणे कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अर्चना यमकर सातवीतून शाळा सोडणार होती. आम्ही तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सर्व शिक्षकांनी तिला मदत केली. तळव्यापासून हाताची बोटे जळाली असतानाही ती जिद्दीने आज शिक्षण घेत आहे. तिची जिद्द इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. आम्ही तिला सर्वतोपरी सहकार्य करीत राहू. 
- एस.  एस.  यादव, मुख्याध्यापिका, मोरणा विद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT