काही सुखद

बहिणीच्या लग्नाला आहेर रक्तदान शिबिराचा

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - थॅलेसेमिया आजाराविषयी प्रबोधन, जनजागृती, रक्तदान शिबिर आणि या थॅलेसेमिया पीडित बालकांसाठी सतत वेगवेगळ्या स्तरांवर मदत करण्यासाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन ही संस्था राबवत असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम या संस्थेने शुक्रवारी (ता. ३१) राबविला. बहिणीच्या लग्नाला भेट म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करून या संस्थेने वेगळाच आदर्श समाजापुढे घालून दिला.

निमित्त होते, चि. सौ. कां. िस्वटी दामोदर मोरे आणि चि. बालाजी रघुनाथ गायकवाड यांच्या येथील विवाह सोहळ्याचे. राज्यभरात विविध संस्थांच्या माध्यमातून िस्वटी कार्यरत आहेत. संस्थेचे रोहित कदम यांची वर्षभरापूर्वी समाजकार्यातूनच त्यांची भेट झाली होती. या भेटीचे रूपांतर बहीण-भाऊ या पवित्र नात्यात झाले. परिणामी, त्या थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भगिनी म्हणूनच कार्यरत झाल्या. तिचे लग्न ठरल्यावर काही तरी स्पेशल गिफ्ट देण्याचा संकल्प झाला. त्यानुसार रक्तदान शिबिराचा उपक्रम घेतला गेला. मोरे आणि गायकवाड कुटुंबीयांनीही त्याचे स्वागत केले. या विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिर हा विशेष चर्चेचा विषय होता. सर्वजण या उपक्रमाचे कौतुक करीत होते. 

शिबिरामध्ये बऱ्याच पुरुषांबरोबर महिलांनीही रक्तदान केले. संस्थेचे धनंजय नामजोशी, रणजित जाधव, अमोल निल्ले, रोहित कदम, अनिल व्हटकर, रिनाताई तुरे, रुपाली कुरणे, डेव्हिड जेंटली, गोपाळ कुंभार, राजताई आणि निखिल हरोले यांनी संयोजन केले. मिरज शासकीय रक्तपेढी आणि मानस रक्तपेढी (सांगली) यांचेही सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT