काही सुखद

धन्यवाद गजानन स्वामी

जाहिरात

पुणे: आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. गजानना स्वामी यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

लॉकडाउनचा काळ अन् कोरोनाचा कहर. त्या परिस्थितीत ओढावलेल्या संकटाची भयानकता आठवून आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. लॉकडाउनमुळे बाहेर सारं काही बंद. अशा वेळी करायचं काय, या प्रश्नानं आख्खं कुटुंब बिथरुन जायचं. अशा काळरात्रीत प्रकाशदूत बनून यायचे ते रिक्षाचालक गजानना स्वामी. नावाप्रमाणेच कठीण प्रसंगी धावून येणारे स्वामी अनेकांसाठी खऱ्या अर्थाने देवदूतच ठरले. लॉकडाउनच्या काळात त्यांनी आपल्या रिक्षातून अनेक रुग्णांना वेळेवर दवाखान्यात सोडून त्यांचे प्राण वाचविले.

42 वर्षीय स्वामी होमगार्ड म्हणून नोकरी करतात. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना दोन महिन्यांची सुटी देण्यात आली. त्यामुळे स्वामी यांनी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला. या काळात प्रशासनाने काही रिक्षाचालकांना पास दिले होते. जास्तीत-जास्त रिक्षांना रुग्णांचीच वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास आपल्याला व आपल्या कुटुंबालाही त्याची लागण होईल, ही भीती मागे टाकत पुरेशी काळजी घेत स्वामी यांनी अडल्या-नडल्यांसाठी आपली सेवा अहोरात्र सुरूच ठेवली. सकाळी उठल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत त्यांची रिक्षा गरजूंसाठी धावत असे. कोरोनाच्या काळात रात्री-अपरात्री रुग्णांना दवाखान्यापर्यंत सुरक्षितपणे पोच केल्याचे स्वामी समाधानाने सांगतात. दिवसापेक्षा रात्रीच रुग्ण मोठ्या प्रमाणात येत होते. हॉस्पीटलप्रमाणेच सोलापूर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता. त्यांच्याकडे कोणी रुग्ण आला तर पोलिसांचा फोन यायचा. मग क्षणाचाही वेळ न दवडता रिक्षा काढायची अन् तडक संबंधित ठिकाणी पोचायचं. रुग्णाला हव्या त्या रुग्णालयात पोचवायचं. ही सेवा स्वामी यांनी अथकपणे बजावली. रात्रीच्या वेळी दोन गर्भवतींना वेळीच दवाखान्यात पोचविले. वेळेत मदत मिळाली नसती तर त्यांना जिवाला मुकावे लागले असते, असे स्वामी यांनी सांगितले.

केवळ कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतरवेळीही गरजूंना मदत करण्याची त्यांची भावना माणसातील देवमाणसाची प्रचिती देते. कोणत्याही प्रवाशाला ते कधीही नकार देत नाहीत. होमगार्डची नोकरी करता-करता रिक्षा चालवून लोकांना मदत करण्याची त्यांची भावना वाखाणण्याजोगी आहे. जनसेवा हीच ईशसेवा माणून त्यांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणिकपणे करतात. याबद्दल स्वामी यांना कॅडबरी डेअरी मिल्ककडून मनःपूर्वक धन्यवाद !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

जळता बकरा अन् कपाळी कुंकू... लखाबाई बनून आलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? गाजवलाय छोटा पडदा

SCROLL FOR NEXT