Art
Art 
काही सुखद

'तिने'गुंफल्या पाना-फुलांच्या आकर्षक कलाकृती

सुवर्णा नवले

पिंपरी - लॉकडाऊनचा काळ म्हणजे सर्वांसाठीच डोकेदुखी ठरला आहे. मात्र, या फावल्या वेळेत तिने बगीचामधील विविध पाने- फुले कलात्मक पद्धतीने गुंफून आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत. सोशल मीडियावर या अनोख्या डिझाईनची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. बागप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव करून शिकण्याची इच्छा देखील त्यांच्याकडे व्यक्त केली आहे.

पुणे अरणेश्‍वर रोड येथील निर्मलबाग सोसायटीत राहणाऱ्या अलका गाडगीळ या 58 वर्षांच्या महिलेने रिकामा वेळ सत्कारणी लावला आहे. नागवेली, मनीप्लांट, तगरीच्या कळ्या, बोगनवेल, मोगरा, गुलाब, मधुमालती, शेवंती अशा पाना-फुलांचा यात वापर केलेला आहे. जवळपास शंभरहून अधिक डिझाईन त्यांनी तयार केलेल्या आहेत. या मनमोहक कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

बगीचा व जंगलातील वाया गेलेल्या वस्तूंपासूनही त्या विविध कलाकृती तयार करीत आहेत. पानांवरच्या विविध प्रकारच्या सूक्ष्म कोरीव कामात त्यांनी विशेष नैपुण्य मिळविले आहे. तसेच स्टॉकिंगच्या फुलांचे विविध शो-पीस तयार केले आहेत. घड्याळ, टेबल टॉप्स अशा विविध वस्तू बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे.

साकारलेल्या अनोख्या डिझाईन
फुलांमध्ये नथ, देवीदेवतांच्या कलाकृती तर पानांमध्ये कोकरू, शारदा, फुलपाखरू, शिपाई, नर्तिका, उदमांजर, जिराफ, उत्क्रांती, अष्टमी घागर फुंकणे, गौरी-गणपती, मोर, बुद्ध अशा विविध कलाकृती साकारल्या आहेत. तसेच त्यांनी रव्याच्या वड्यांपासून विविध डिझाईन तयार केल्या आहेत. रांगोळी कॅलिग्रॅफीतूनही समाजाला विविध संदेश त्यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT