काही सुखद

इराची अफलातून जादुगिरी 

नीला शर्मा

इरा सचिन जोशी ही साडेचार वर्षांची मुलगी म्हणजे "वंडर गर्ल' आहे. जादू करून ती काडी आणि नाणं गायब करते. रिकाम्या कागदी पाइपमधून रुमाल काढून दाखवते. अंड्याच्या टरफलावर रंगवलेल्या बाहुलीचं मनोगत सांगते. धमाल म्हणजे भातुकलीच्या माध्यमातून तिचा पाककृती शिकवण्याचा लज्जतदार कार्यक्रम सादर करते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराला एखादं गोष्टीचं पुस्तक सफाईनं वाचताना पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. तिची आई अमृता जोशी म्हणाली, "नर्सरी, प्रिप्रायमरी, प्रायमरी अशा इंग्रजी शिक्षणपद्धतीऐवजी इराला मराठी शाळेत थेट पहिलीला घालायचं आहे. त्यामुळे तिला अजून अक्षरओळख झालेली नाही. मात्र तिला भरपूर चित्र असणारी गोष्टींची पुस्तकं आम्ही देत असतो. एकेक पान उलटत ती चित्रांचा संदर्भ लक्षात ठेवून कथानक घडाघडा म्हणते. मी आणि सचिन (इराचा बाबा) नाट्यकर्मी आहोत. अनेकदा मी इराला माझ्या नाटकांच्या तालमीला नेते. वरवर पाहता ती चित्रं काढत बसलेली दिसते, पण माझे बरेचसे संवाद तिला पाठ होतात. कहर म्हणजे मी स्वतःशी ते म्हणून पाहताना ही अचानक केव्हा तरी मला थांबवते. प्रश्न विचारते की, तुला त्या काकांनी इथं असं-असं बोलायला सांगितलं होतं ना? मग तू तसं का नाही बोलत?' 

इराच्या आईने असंही सांगितलं की, मी समाजमाध्यमांवर अधूनमधून पाककृतीचे कार्यक्रम बघते तर ही पूर्ण एकचित्ताने ते पाहत आणि ऐकत असते. मग भातुकलीच्या खेळात त्या-त्या दिवशीच्या तिच्या मूडप्रमाणे ती पदार्थ ठरवते. जणू काही ती एखादा कुकरी शो सादर करते आहे, इतक्‍या सफाईदारपणे ते चाललेलं असतं. "यासाठी लागणारं साहित्य आधी मी तुम्हाला सांगते, इथपासून ते झाली आता गरमागरम साबुदाणा खिचडी. लाइक करा. शेअर करा आणि कमेंट जरूर कळवा. टाटा,' असा समारोप ती करते. तिला ऑम्लेट करून देते तेव्हा ती अंड्याची टरफलं मागून घेते आणि त्यांवर चित्रं काढत बसते. मुलांना जमतील असे जादूचे प्रयोग एका संकेतस्थळावर दिसले. तिला विचारलं की, तुला जादू शिकायची आहे का, तर उत्साहाने तयार झाली. ते प्रयोग झटपट बसवले आणि रोज तिला हवं तेव्हा आम्हाला समोर बसवून ते दणक्‍यात चाललेले असतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT