काही सुखद

वीरपत्नीच्या दातृत्वाला सलाम, मदत करुन केलं पुण्याचं काम!

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : मेढा (ता. जावळी) गावचे हुतात्मा वीरजवान अशोक धनाजी जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांची वीरपत्नी श्रीमती सुवर्णा अशोक जाधव यांनी मेढा येथे लोकसहभागातून होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज इमर्जन्सी कोविड केअर सेंटरसाठी एका ऑक्‍सिजन बेडसाठी लागणाऱ्या रकमेचा धनादेश जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, भाजपचे नेते अमित कदम यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला. 

खरेतर देशासाठी सर्वस्व देणाऱ्यांना देशाने खूप काही देणे अपेक्षित असते. मात्र, इथे जेव्हा जेव्हा देशाला गरज असेल, तेव्हा जवान पुढे येऊन लढत असतात. अशाच पद्धतीने या वीरपत्नीनेदेखील पुढे येऊन केलेले हे काम आदर्श असे आहे. त्यांच्या या दातृत्वास सलाम आहे, असे गौरवोद्‌गार यावेळी गटविकास अधिकारी बुद्धे यांनी काढले. यावेळी माजी सरपंच सुजित जवळ, सामाजिक कार्यकर्ते जब्बारभाई पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. वीरपत्नी सुवर्णा जाधव यांच्या या दातृत्वाबद्दल जयहिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, सचिव हणमंत मांढरे, जावळी तालुकाध्यक्ष रवींद्र कदम, संतोष कदम, अनिता गायकवाड, धनंजय गोरे यांनी अभिनंदन केले. 

दरम्यान, देशाला संकट काळात जेव्हा केव्हा गरज असेल, तेव्हा जवान पुढे येत असतात. त्याचप्रमाणे आज वीरपत्नीने दिलेले योगदान हे लाखमोलाचे आहे. त्यांनी केलेली मदत ही आदर्शवत अशी आहे. त्यांना मदत करणाऱ्या जयहिंद फाउंडेशनचेदेखील काम कौतुकास्पद आहे, असे जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT