काही सुखद

७५ टक्के अंधत्व; तरी शिष्यवृत्तीत यश

सकाळवृत्तसेवा

राजापूर - जन्मजात सुमारे पंचाहत्तर टक्के अंध. तरीही उच्च ध्येय गाठण्याची महत्त्वाकांक्षा. अपंगत्वाने खचून न जाता यशाचे शिखर गाठण्याचा नेहमीच तिच्या ध्यास. त्यामुळे आत्मिक बळाला प्रयत्नांची जोड देत तालुक्‍यातील नाणार येथील तनिषा पेडणेकरने यशाला गवसणी घातली. तनिषाने मदतनीसाच्या साह्याने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीनशेपैकी १४६ गुण मिळवले.

वडिलांचा छोटासा व्यवसाय आणि आई अंगणवाडी सेविका. तनिषा जन्मजात पंचाहत्तर टक्के अंध असल्याने शारीरिकदृष्ट्या अपंग होती;  मात्र बौद्धिकदृष्ट्या कणखर आणि तल्लख असलेल्या तनिषाने अन्य मुलांसोबत श्रीगणेशा नाणार येथील जिल्हा परिषदेच्या  शाळेत गिरवला. शिक्षकांनीही जिद्दीने तिला मार्गदर्शन सुरू केले. उत्तम वक्तृत्व आणि नृत्यात निपुण ही तिची आणखी वैशिष्ट्ये. प्रशालेचे मुख्याध्यापक  हिदायत भाटकर आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने परीक्षेची जोरदार तयारी केली. दीड ते दोन फुटांपर्यंतच स्पष्ट दिसत असलेल्या तनिषाला फळ्यावरील वाचण्याचा त्रास होतो. त्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी वैयक्तिक तोंडी मार्गदर्शनाचे विशेष वर्ग घेण्यात आले. परीक्षेच्या वेळी मदतनीस  असलेल्या विद्यार्थ्याचेही योगदान मोलाचे ठरले. नाणारसारख्या ग्रामीण भागातून तनिषाने मिळविलेले यश साऱ्यांसाठी निश्‍चितच आदर्शवत आहे. याबाबत तिचे विशेष कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

IND vs JPN, Playing XI: जसप्रीत बुमराह संघाबाहेर, वैभव सूर्यवंशीला मिळाली का संधी? पावसामुळे किती ओव्हरची होणार मॅच?

Anant Chaturdashi 2026: बाप्पाला निरोप देण्यापूर्वी 'हे' नियम अन् विधी नक्की जाणून घ्या; पाहा उत्तरपूजा आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त!

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Liz East Motivational Story : वकिली सोडली, कुत्रे फिरवण्याचा व्यवसाय सुरू केला; आता महिन्याला कमावते १५ लाख!

SCROLL FOR NEXT