Kahi-Sukhad
Kahi-Sukhad 
काही सुखद

किडणी प्रत्यारोपणासाठी एक लाखाची मदत

सकाळवृत्तसेवा

पुसेसावळी - सोशल मीडियाचा वापर करून अनेक समाजोपयोगी कार्य करता येतात, याचे मूर्तिमंत उदाहरण श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी करून दाखवले. किडणीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रेठरे हरणाक्षमधील अक्षय शंकर शिंदे (वय २२) या युवकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लाख ११ हजार रुपयांची मदत जमा केली.

रेठरे हरणाक्षमधील (जि. सांगली) शंकर शिंदे हे शेती करतात. अल्पभूधारक शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अक्षय हा त्यांचा एकुलता एक मुलगा. शिक्षण झाल्यानंतर गावातीलच सहकारी बॅंकेत कामावर जात होता. अक्षय अचानक आजारी पडला. दवाखान्यात तपासणी केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले. पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अक्षयची आई निशा यांनी त्याला किडणी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर याच हॉस्पिटलमध्ये किडणी प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. घरची स्थिती बेताची असल्याने शिंदे कुटुंबीयांची आर्थिक अडचण होत होती.

अक्षयच्या उपचारासाठी मदत करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी सोशल मीडियाचा वापर करून आर्थिक मदतीचे आवाहन केले. १०० रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंतची मदत अक्षयच्या आईच्या नावाने असलेल्या बॅंक खात्यावर जमा केली. दहा दिवसांतच एक लाख ११ हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत. अजूनही मदतीचा ओघ सुरू असून या आर्थिक मदतीतूनच अक्षयवर किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT