नागपूर - अवयवदानासाठी आवश्‍यक शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर.
नागपूर - अवयवदानासाठी आवश्‍यक शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर. 
काही सुखद

मेंदूमृत व्यक्तीने वाचवला तिघांचा जीव

सकाळवृत्तसेवा

नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मेंदू मृत झालेल्या ४६ वर्षीय रुग्णाच्या यकृतासह दोन किडनी दानातून तीन जणांना जीवदान मिळाले आहे. तर दोघांच्या काळोख दाटलेल्या डोळ्यांमध्ये उजेड पेरण्याचे सत्कर्म मेयोतील पहिल्या अवयवदानातून झाले. 

राम काकुमल खिलनानी (वय ४६) असे मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून जरीपटका येथील रहिवासी आहेत. खिलनानी यांचा २० जुलै रोजी गिट्टीखदान परिसरात अपघात झाला. नातेवाइकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) भरती केले.

मंगळवार २४ जुलैला खिलनानी यांच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान करण्यात आले. दरम्यान, मेयोचे  अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. वैशाली शेलगावकर, डॉ. संध्या मांजरेकर, डॉ. रवी चव्हाण तसेच सामाजिक अधीक्षक अजय वानखेडे, चेतन मेश्राम, राहुल बनकर यांनी खिलनानी यांच्या पत्नी सिमरन यांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. सिमरन यांनी मनाची तयारी करीत होकार दिला. तत्काळ अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. 

यकृत निकामी झाल्याने प्रतीक्षेतील आयुष्य जगत असलेला व्यक्ती न्यू इरात आढळला.रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांच्याशी संपर्क साधण्यात आला. डॉ. राहुल सक्‍सेना यांनी या प्रत्यारोपणातून एका ४६ वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचविले, अशी माहिती डॉ. आनंद संचेती यांनी दिली. तसेच खिलनानी यांची एक किडनी ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आली. या किडनी दानातून ४२ वर्षीय व्यक्तीला जीवदान मिळाले. ही शस्त्रक्रिया डॉ. प्रकाश खेतान, डॉ. संदीप देशमुख, डॉ. सुहास साल्फेकर, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. नीता देशपांडे यांनी केली. तर दुसरी किडनी केअर रुग्णालयातील प्रतीक्षा यादीतील रुग्णाला देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT