काही सुखद

गुणवंतांच्या पाठीवर गोडबोले ट्रस्टची थाप; तीन लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

सिद्धार्थ लाटकर

सातारा : रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळा समर्थ सदन येथे झाला. ट्रस्टच्या वतीने यावर्षी तीनशेहून अधिक विद्यार्थी व संस्थांना एकूण तीन लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
 
बालवाडीपासून बारावीपर्यंत तसेच काही सामाजिक व सेवाभावी संस्थांना या मदतीचे वितरण ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले, माजी नगराध्यक्ष व बालरोगतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सामाजिक अंतर राखून झालेल्या कार्यक्रमात तीन टप्प्यात शिष्यवृत्तीचे वितरण झाले. या वेळी कौशिक प्रकाशनचे अकरा मारुतींची माहिती हे पुस्तकही भेट देण्यात आले.

पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

अरुण गोडबोले म्हणाले,"" बन्याबापू गोडबोले यांनी सुरू केलेल्या ट्रस्टला आता 49 वर्षे पूर्ण झाली असून, गोडबोले कुटुंबीयांची तिसरी पिढी या सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे. याचा मोठा आनंद वाटतो. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षीप्रमाणे घेतला जाणारा भव्य सोहळा रद्द करून ही मदत गरजूंना पोचावी, यादृष्टीने हा छोट्या रूपात कार्यक्रम घेण्यात आला.'' या वेळी आयडीबीआय ट्रस्टीशिप कंपनीच्या मानसी माचवे, मानसी पत्की, माधवराव गोडबोले, उदयन गोडबोले, अशोक गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले, आर्यन गोडबोले उपस्थित होते.

घरखरेदीची हीच खरी संधी; गृहकर्ज दर, मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

PM मोदी आणि मॅक्रॉन मुंबईत, प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘रेड लाइन’ सज्ज; एप्रिलपासून मेट्रो धावणार, २३ किमी मार्गाच्या चाचण्या यशस्वी..

MHADA Mumbai Lottery : मुंबईत स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी ! म्हाडाच्या FCFS सदनिकांसाठी आजपासून अर्ज नोंदणी सुरु, काय आहे प्रक्रिया ?

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT