Satara Latest Marathi News 
काही सुखद

एकदम भारी! खोजेवाडीत झाडांना पाणी घालून 'होळी'; अभिनेते सयाजी शिंदेंकडून युवकांचे कौतुक

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : 'हरित खोजेवाडी' प्रकल्पाला यशस्वीतेचे बळ देताना गावातील युवकांनी झाडांना पाणी देत होळी साजरी केली. तरुणाईकडून साकारल्या जात असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. 

खोजेवाडी हे सातारा तालुक्‍यातील गाव. अलीकडच्या काळात गावात "हरित खोजेवाडी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावाभोवती असलेला डोंगर हिरवागार करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. त्याला ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांचाही हातभार लाभताना दिसत आहे. लोकसहभागाचे मोठे बळदेखील या उपक्रमास मिळत आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या उपक्रमाचा प्रारंभ झाला असल्याची माहिती कृष्णत घोरपडे यांनी दिली. त्यानंतर लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात झाडांचे रोपण करण्यात आले. योग्य काळजी अन्‌ संवर्धन यामुळे आता या झाडांची चांगलीच वाढ झाली आहे. 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे जगावीत यासाठी युवकांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने सर्व झाडांना पाणी घालून युवकांनी होळीचा सण साजरा केला. गावातील विरेंद्र कळसकर यांनी झाडांसाठी स्वतः पाण्याचा टॅंकर देऊन आगळी सामाजिक बांधिलकी जपली. आयुष जाधव, दीपक जाधव, संकेत देशमुख, प्रशांत घोरपडे, श्रेयस घोरपडे, राज कदम, बाळासाहेब कदम, विराज कळसकर, गणेश मदने, अभय मदने आदी युवकही या उपक्रमात सहभागी झाले. युवकांच्या या प्रयत्नाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. 

सयाजी शिंदे यांची भेट 

सह्याद्री वनराई प्रकल्पप्रमुख अन्‌ ख्यातनाम अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या प्रकल्पास भेट दिली आहे. गावातील युवकांचा वाढदिवस हा झाड दिवस म्हणून साजरा केला जातो. गावातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर झाड लावून त्याच्या स्मृती जपल्या जात असल्याची माहिती कृष्णत घोरपडे यांनी यावेळी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT