रत्नागिरी - जिल्ह्यात आज 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 278 वर पोहोचली आहे. आज 16 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 828 वर झाली आहे. आज चिपळूण येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज कोरोनाच्या चाचण्याही वाढल्या आहेत. एकूण 263 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी हे 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर चाचणी झालेले 5 तर ऍण्टीजेन 7 रुग्ण आहेत. यामध्ये रत्नागिरी 1, दापोली 3, चिपळूण 6, संगमेश्वर 1, लांजा 1 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज 16 जणांनी कोरोनावर मात केली.
बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 828 झाली असून रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 95.14 टक्के झाले आहे. जिल्ह्यात 251 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकूण निगेटिव्ह स्वॅबची संख्या 61 हजार 026 झाली आहे. चिपळूण येथील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 334 झाली असून मृत्यूदर 3.57 टक्के झाला आहे. विविध कोविड रुग्णालयात 84 जण उपचार घेत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.