2000 incomplete house working in 100 days said uday samant in ratnagiri 
कोकण

Good News : रत्नागिरीतील २ हजार घरे होणार १०० दिवसांत पू्र्ण

राजेश शेळके

रत्नागिरी : शासनाच्या महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात 2 हजार 142 घरे अपूर्ण आहेत. ही अपूर्ण घरे शंभर दिवसात पूर्ण करायची आहेत. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात शिबिर घेऊन तातडीने त्यातील अडीअडचणी सोडवून मार्ग काढावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महाआवास अभियानाच्या आढाव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, महाआवास अभियान चार वर्षे सुरू आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यात 8 हजार 100 घरांचे उद्दिष्ट होते. यातील 5 हजार 980 घरांना मंजुरी मिळाली तर 3 हजार 838 घरे पूर्ण झाली. परंतु गेली चार वर्षे 2 हजार 142 घरे अपूर्णावस्थेत आहेत. यात 2020-21 मध्ये मंजुरी मिळालेल्या 1 हजार 513 ही सर्व घरे अपूर्ण घरांच्या यादीत आहेत. 

लॉकडाउनमुळे यावर्षी घरबांधणी थांबली होती; मात्र शासनाने या योजनेतील मंजूर झालेली घरे 100 दिवसात पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात शिबिर घेऊन मंजूर झालेली घरे का रखडली आहेत, याची माहिती घेऊन तातडीने त्यातील त्रुटी दूर कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. 


मेडिकल कॉलेजसाठी आटोकाट प्रयत्न 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे. रत्नागिरीतही मेडिकल कॉलेज होणार; मात्र सिंधुदुर्गात एमबीबीएस पदवी असेल आणि त्यापुढील एमडी पदवी रत्नागिरी जिल्ह्यात घेता यावी, म्हणून रत्नागिरीतही मेडिकल कॉलेज होण्याच्यादृष्टीने आमचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत

Satara Crime: 'दोन महिलांना मारहाण करून लुटले'; मॉर्निंग वॉकसाठी जाताना प्रकार, साडेसात तोळे दागिने लंपास

Breakfast Recipe: वीकेंडच्या नाश्त्यासाठी घरी बनवा चविष्ट चीझ गार्लिक ब्रेड, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT