22 Gram Panchayats unopposed in Chiplun  
कोकण

चिपळुणातील 22 ग्रामपंचायती बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत एकूण 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 61 ग्रामपंचायतीसाठी 674 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तालुक्‍यात कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्यांनी ग्रामपंचायती किती ताब्यात आल्या याबाबत दावा केलेला नाही. 

तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण 1210 अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 189 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली तर 22 ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. त्यामुळे 22 ग्रामपंचायतीमध्ये 347 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. आता 61 ग्रामपंचायतीत निवडणूका होणार आहेत. यामध्येही अनेक गावात एक-दोन प्रभागातच निवडणुका होत आहेत. 

तालुक्‍यातील विविध गावांमध्ये राजकीय पक्षांचे नेते व गाव पुढाऱ्यांच्या माध्यमातून बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न झाले. परंतु अनेक ठिकाणी या नेत्यांना अपयश आले. तालुक्‍यातील सावर्डे ही महत्वाची ग्रामपंचायत मानली जाते. या ठिकाणी बिनविरोधसाठी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. सावर्डे येथे 17 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्या तर 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. खेर्डी येथेही सुरवातीला बिनविरोधसाठी चर्चा झाली; मात्र या ठिकाणी दोन पॅनेल आमनेसामने असून येथे मोठी चुरशीची लढत आतापासूनच सुरू झाली आहे.

जिल्ह्यात विविध तालुक्‍यातील राजकीय नेत्यांनी आमच्याकडे इतके-इतके सदस्य तसेच ग्रामपंचायती असल्याचा दावा केला होता; मात्र चिपळूण तालुक्‍यात अद्याप एकाही नेत्याने असा दावा केलेला नाही. प्रामुख्याने तालुक्‍यात राष्ट्रवादी व शिवसेनेचे वर्चस्व असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सध्यातरी मौन बाळगणेच पसंत केल्याचे दिसून येत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT