23 year old Engineering student Sarpanch Selection political marathi news
23 year old Engineering student Sarpanch Selection political marathi news 
कोकण

कोकण : राजकीय पार्श्‍वभूमी नसताना इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी झाली सरपंच! 

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील पांगारी तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध विराजमान होण्याचा बहुमान वयाच्या 23 वर्षीच व इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत मीनाक्षी गुरव यांना मिळाला असून उपसरपंचपदी शंकर मांजरेकर यांचीही निवड करण्यात आली आहे. 

पांगारीतर्फे हवेली या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली होती. यात सदस्य म्हणून सुभाष सकपाळ, जनार्दन खापरे, सौ. दीपिका महाकाळ, गीतांजली लोंढे, सौ. सोनिया जाधव आदी निवडून आले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनोहर शिबे, सामाजिक कार्यकर्ते अकबर इनामदार, माजी सरपंच धोंडू नाचरे, माजी पंचायत समिती सदस्य सौ.अंजली भागणे, माजी सरपंच नजर बर्डे, तंटामुक्‍त गाव समितीचे अध्यक्ष विठोबा सकपाळ यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते. सरपंच मीनाक्षी गुरव म्हणाल्या, आपण इंजिनिअरिंग पदवीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण लवेल येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात घेत आहोत. 

राजकीय पार्श्‍वभूमी नसताना.. 
माझ्यासारख्या विद्यार्थिनीला कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना व आपण सर्वसामान्य कुटुंबातील असूनही ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंचपदाचा बहुमान दिला आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थांची आभारी आहे. गावाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून सर्वांच्या सहकार्यातून व सल्ल्याने आपण काम करणार आहोत, असेही मीनाक्षी गुरव यांनी स्पष्ट केले.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT