रत्नागिरी : वाढता कोरोना संसर्ग (corona patients incresed) रोखण्यासाठी जिल्ह्यात 2 ते 8 जून असा सात दिवसाचा कडक लॉकडाउन (lockdown incresed for 7 days) घोषित करण्यात आला आहे. (ratnagiri district) औषध दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना वगळता सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना पूर्णता: बंद राहतील. दूध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत पुरविता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह प्रमाण 20% असून 67% च्या वर ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने 2 ते 8 जून या सात दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. आरोग्य सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना पूर्णता: बंद राहतील.
दरम्यान जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात (borders also seal) आल्या असून जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी, कोरोना व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या, आणीबाणीच्या प्रसंगी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा राहील.
जिल्ह्यात प्रवेश करणार्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात सुरु ठेवण्यास मुभा आहे. मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. कोणत्याही ग्राहकांस थेट माल पुरविता येणार नाही.
"व्यापारी म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनापुढे दोन पर्याय ठेवले होते. एकतर मेडिकल, आरोग्यसेवा वगळता कडक लॉकडाऊन करा किंवा नियम, अटी घालून व्यापार्यांना दुकाने उघडण्याची मुभा द्या. त्यापैकी प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र त्यांची किती कडक अंमलबजावणी होते यावर सर्व अवलंबुन आहे."
- गणेश भिंगार्डे, शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.