2 महिन्यासाठी सागरी क्षेत्रातील मासेमारीवर बंदी

सागर किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये मासेमारीला बंदी
2 महिन्यासाठी सागरी क्षेत्रातील मासेमारीवर बंदी

हर्णे : पावसाळ्यात मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हर्णे बंदरातील मासेमारी नौका समुद्राबाहेर काढण्यासाठी मच्छीमारांची धावपळ सुरू झाली आहे. जून आणि जुलै महिन्यातील मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्तहानी टाळणेही त्यामुळे शक्य होते. त्यामुळे सागर किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर मासेमारीसाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरात साधारणपणे ८०० ते ९०० परवानाधारक मासेमारी नौका आहेत. शासनाने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या काळात निर्धारित केलेल्या कालावधीत माशांचा प्रजनन काळ असल्याने या काळात मासेमारीला बंदी असते. त्यामुळे बंदरातील बोटी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मासेमारांनी बोटी समुद्राबाहेर काढण्याची लगबग सुरू केली आहे. हर्णे बंदरात जेटीच्या अभावामुळे हर्णे बंदर, पाजपंढरी बंदर, येथे कमी प्रमाणात तर बहुतांशी नौका जयगड, आंजर्ले, दाभोळ (रत्नागिरी), दिघी (रायगड) आदी खाड्या सुरक्षित असल्याने याठिकाणी शाकारल्या आहेत.

2 महिन्यासाठी सागरी क्षेत्रातील मासेमारीवर बंदी
'...तर मी राजीनामा द्यायला तयार'; संभाजीराजे छत्रपती

या नौका ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढल्या जात असल्याने एक दोन दिवसातच ही प्रक्रिया पुर्ण होते. गेले दोन वर्ष कोरोनामुळे मच्छिमारांचा व्यवसाय तोट्यात आहे. चक्रीवादळांसह बदलत्या हवामानाचा फटका व्यवसायिकांना बसला आहे. मानवनिर्मित फास्टर आणि एलईडी लॉईटव्दारे होणारी मच्छिमारी पारंपारिक मच्छिमारांची डोके दुखी ठरली होती. त्यामुळे कधी वादळसदृष्य परिस्थितीमुळे तर कधी फास्टर आणि एलईडी बंदीच्या मागणीसाठी मच्छिमारांना रस्त्यावर उतरावे लागल्याने मासेमारी बंद होते. त्यामुळे आधीच आर्थिक गर्तेच्या चक्रात अडकलेल्या मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना बंदी काळात बोटी बाहेर काढाव्या लागल्याने कर्जाच्या हप्ते कसे फेडावे याची चिंता लागली आहे.

फास्टर आणि एलईडी मासेमारी आणि गेले दोन वर्षे वादळ आणि हवामानातल्या बदलांमुळे मासेमारीचा हंगाम वाया गेला. शासनाचे परिपत्रकानुसार १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांनी नियम पळून नौका सुरक्षित ठिकाणी शाकरल्या आहेत. पुढचे दिवस कसे काढायचे याची चिंता मच्छीमारांनी लागली असून सरकारने किमान २०१८ पासूनचा परतावा द्यावा अशी मागणी होत आहे.

- अनंत चोगले, मच्छीमार

2 महिन्यासाठी सागरी क्षेत्रातील मासेमारीवर बंदी
आता जादा दराने खत विक्री केल्यास गुन्हा दाखल होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com