कोकण

अहो, आंब्याप्रमाणे कलिंगडासही परवानगी द्या, नाहीतर...

सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड होते पण लॉकडाऊनचा फटका या पिकाला बसला आहे. गेल्या वीस दिवसांत संचारबंदीमुळे कलिंगडाच्या मागणीत व विक्रीत सुमारे 95 टक्के घट झाली आहे. तालुक्‍यातील वराड येथे कलिंगडाची मोठ्‌या प्रमाणात लागवड केली जाते. येथे कलिंगडे विक्रीविना पडून असल्याने ती खराब होऊन फेकून देण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये गुंतवून पिकवलेली कलिंगडे आंब्या प्रमाणेच जिल्ह्याबाहेर विक्रीस पाठविण्यास शासनाने परवानगी द्यावी, अन्यथा नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वराड येथील कलिंगड उत्पादक शेतकरी सखाराम परब, सोमा परब आणि सामाजिक कार्यकर्ते राजन माणगांवकर यांनी केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत विविध भागात कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी व महिला बचत गटांच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर स्टॉल लावून याची विक्रीदेखील करतात. कलिंगड तयार करण्याकरता बियाणी-रोपे, सिंचन सुविधा, फवारणी, कीटकनाशके व अन्य खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. मात्र या कलिंगड उत्पादकांच्या मालाला बाजारपेठ न मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्‍यातील वराड गावात काही शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे 10 ते 12 एकरावरऑक्‍टोबर - नोव्हेंबर मध्ये कलिंगडाची लागवड केली आहे. 


संचारबंदीत शासनाने भाज्या फळे विक्रीस सूट दिली आहे. तर आता आंब्याच्या विक्रीस व वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर कलिंगड विक्रीस व वाहतुकीस परवानगी मिळावी. अन्यथा कर्जे काढून व मेहनत घेऊन पिकवलेले कलिंगड फेकून देण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. यावर उपाय म्हणून भाजी विक्रीसाठी सध्या जे व्यापारी आपल्या जिल्ह्यात येत आहेत त्यांच्या कडे कलिंगड विक्रीसाठी देण्याची परवानगी शासनाने द्यावी. 
- राजन माणगावकर 

भातशेतीचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. म्हणून कलिंगडाची लागवड केली. त्यासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च आला. पण संचारबंदीमुळे विक्री न झाल्यास मोठे नुकसान होणार आहे. या पिकासाठी कोणतीही विम्याची तरतूद नाही. अशावेळी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. 
- सोमा तुकाराम परब  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT