कोकण

गणपतीपुळे मालगुंडहून 22 जणांची रेस्क्यू टीम चिपळूणला रवाना

- राजेश शेळके

मालगुंड परिसरातील जीव रक्षक, सर्पमित्र, साहसी युवकांचा रेस्क्यू टीम मध्ये समावेश आहे.

रत्नागिरी: संकटात नेहमीच मदतीला धावून येणारे कर्तव्यदक्ष मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पाटील आणि अमित गनवटकर यांनी रात्रभर परिश्रम घेवून 22 जणांची रेस्क्यू टीम चिपळूणला रवाना केली आहे. यामध्ये सर्व साहित्य गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दिले. यासाठी गणपतीपुळे-मालगुंडच्या सरपंच कल्पना पकये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मालगुंड परिसरातील जीव रक्षक, सर्पमित्र, साहसी युवकांचा रेस्क्यू टीम मध्ये समावेश आहे. यामध्ये राज देवरुखकर (गणपतीपुळे), सुरज पवार, योगेश पालकर, मयुरेश देवरुखकर, अक्षय माने, रोहित चव्हाण, आशिष माने, सिद्धेश माने, ओंकार गावणकर, अनिकेत चव्हाण, चेतन बोेरकर (मालगुंड), नितेश मयेकर, सुरज सुर्वे, निनाद सुर्वे, सचिन सुर्वे, विशाल साखळकर, हर्षवर्धन साळवी, अनिकेत लोगडे भगवतीनगर, अनिकेत राजवाडकर, विक्रम राजवाडकर, संकेत भुवड जयगड यांचा समावेश आहे. तसेच गणपतीपुळे जिवरक्षक टिममध्ये 21 जणांचा समावेश आहे.

बोट जेट स्की चालवणारे 5 जण, सर्पमित्र 2, लाईफगार्ड 8 जणांचा समावेश आहे. यामध्ये साप पकडायची टॉंग 1, बोया रिंग 3, जॅकेट 20, रश्शी 1, स्ट्रेचर 1 सामानाचा समावेश आहे. या सर्वाची माहिती उपविभागीय अधिकारी श्री विकास सूर्यवंशी यांना देऊन ही रेस्क्यू टीम चिपळूणला रवाना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT