Abhay Shirsat criticize on shivsena kokan political marathi news
Abhay Shirsat criticize on shivsena kokan political marathi news 
कोकण

आता तडजोड नाही ; शिवसेनेला जय महाराष्ट्र  तर कुडाळात कॉंग्रेस स्वबळावर 

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा घरवापशी केल्याचे अभय शिरसाट यांनी सांगितले. कुडाळमध्ये कॉंग्रेसची ताकद आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीत जर महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी विचार सहानुभूती केला नाही तर आम्ही कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू, असे  शिरसाट यांनी येथे झालेल्या स्वागतावेळी सांगितले. 

शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करून कॉंग्रेस स्वगृही झालेले शिरसाट यांचे स्वागत शहरातील गांधी चौक येथे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तालुकाध्यक्ष आबा मुंज, अरविंद मोंडकर, प्रकाश जैतापकर, मंदार शिरसाट, प्रसाद बांदेकर, बकत्तावर मुजावर, अरविंद शिरसाट, उल्हास शिरसाट, चिन्मय बांदेकर, घावनाळे उपसरपंच वारंग, निता राणे, बाळू अंधारी, किशोर काणेकर, विजय प्रभू, व्हि. डी. जाधव, आत्माराम जाधव, ऍड. दिलीप नार्वेकर, सदासेन सावंत, प्रसाद धडाम आदी उपस्थित होते. 

पाय खेचण्याची प्रवृत्ती 
शिरसाट म्हणाले, "मी मूळचा कॉंग्रेसवालाच. शिवसेनेत असलेली पाय खेचण्याची प्रवृत्ती तसेच काम करणाऱ्याला कोणताही सन्मान मिळत नाही. त्यामुळे पुन्हा कॉंग्रेसवासीय झालो. आता कुडाळ शहरासह ग्रामीण भागात कॉंग्रेस पक्ष जोमाने वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू. 

आता तडजोड नाही 
शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्राचा फॉर्मुला आहे तो कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत चालणार नाही. कारण या ठिकाणी कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जागा आम्ही मागणार आहोत. जर यामध्ये कोणतीही तडजोड झाली नाही तर कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता स्थापन करेल.''  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT