ABVP Demand Regarding Tuition Fee Ratnagiri Marathi News
ABVP Demand Regarding Tuition Fee Ratnagiri Marathi News  
कोकण

शैक्षणिक शुल्काबाबत अभाविपने केली आहे ही मागणी

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोना महामारीने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ, शाळांच्या परीक्षा रद्द झाल्याने परीक्षा शुल्क रद्द करावे. मुंबई विद्यापीठाने पुढील वर्षाचे शुल्क भरण्याचे पत्र काढले आहे; मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच त्या वर्षाचे शुल्क घ्यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. 

आर्थिक अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांची शुल्क भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाच्या शुल्काबाबत 27 मे रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक पत्र काढले आहे. त्यात असे नमूद केले आहे की, परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अन्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत.

असे असून सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या संलग्न काही महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या संपूर्ण शुल्काची मागणी केली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा महाविद्यालये सुरू होतील तेव्हा पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क टप्प्याटप्प्याने घेण्यात यावेत, अशी मागणी अभाविपने केली आहे. 

कोरोनामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील व्यवहार बंद झाले आहेत. परिणामी अनेकांच्या आर्थिक उत्पन्नाची साधने बंद झाली आहेत. यामुळे अनेक आर्थिक व मानसिक समस्यांना विद्यार्थी व पालक सामोरे जात आहेत. परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्काबाबत लवकर निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना विद्यापीठ प्रशासनाने दिलासा द्यावा, असे कोकण प्रदेश सहमंत्री अमित ढोमसे यांनी सांगितले. 

त्वरित निर्णय न झाल्यास आंदोलन 
महाराष्ट्र शासनाने परीक्षा रद्द केल्या असूनही विद्यापीठाच्या पत्रकानुसार विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क मागण्यात येत आहे. अभाविपने याला विरोध दर्शवला आहे. ज्यांचे परीक्षा शुल्क घेतले आहे ते परत करावे. या दोन्ही विषयासंदर्भात त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT