ABVP Demands On University Examination Ratnagiri Marathi News
ABVP Demands On University Examination Ratnagiri Marathi News 
कोकण

अभाविपने विद्यापीठांच्या परीक्षा संदर्भात केली 'ही' मागणी

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच महाविद्यालये सुरू न करता केंद्रीय मंत्री परिषदेने सुचवलेल्या निर्देशानुसार 16 मेपासून सुरू करावीत. महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ वगळता अन्य सर्वच विद्यापीठांची परीक्षा ठराविक वेळेत घेण्यात याव्यात, जेणेकरून निकाल लावणे व पुढील शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरू होण्यास मदत होईल.

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा घ्याव्यात. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेऊ नयेत, कारण त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्याकडे दिल्या. 

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या शैक्षणिक परिस्थितीबाबत अभाविपने आपली भूमिका या पत्राद्वारे जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा होणे महत्वाचे आहे, असे अभाविपचे मत आहे. परीक्षेचे धोरण ठरवताना अभाविपने सर्व विद्यापीठ प्रशासन, प्राचार्य, प्राध्यापक, सिनेट मेंबर, विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. 

विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक शुल्क भरलेले असताना त्यांना शिक्षण मिळण्याचा संपूर्ण अधिकार आहे. प्रात्यक्षिक, इंटर्नल असाईनमेंट, प्रकल्प देण्याकरीता पुरेसा वेळ मिळावा. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता तो कमी करण्यासाठी टप्याटप्याने परीक्षा घ्याव्यात. विद्यार्थी शिकतो त्याच महाविद्यालयात पेपर्स तपासणी करावी. जेणेकरून निकाल वेळेत लागतील व कोरोना संसर्गाचा धोकाही कमी उद्‌भवेल, अशा विविध मागण्या अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ, कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी सामंत यांना पाठवल्या आहेत. 

ऑगस्टपासून नवीन वर्ष 

प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा या 50 गुणांच्या घेऊन त्यांचे 100 गुणांमध्ये रूपांतर करावे. दूर व मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा वेळेत घ्यावी. जूनअखेरीस परीक्षा झाल्यावर जुलैमध्ये निकाल लागतील व नवे शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये सुरू होईल. पुढील शैक्षणिक सत्रातील सुट्टी कमी करून ते दिवस भरून काढावेत. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या अति संसर्गित असलेली शहरे व जिल्ह्यांतील लॉकडाउन 30 एप्रिलनंतरही वाढला तर या ठिकाणाच्या परीक्षा जूनमध्येच घेण्याची सूचना केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT